आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर लंडनला शिफ्ट होणार सोनम! होणा-या नव-याने खरेदी केले दोन बेडरुमचे घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत 6 आणि 7 मेला मुंबईत लग्न करणार आहे. लग्नानंतर दिल्लीमध्ये ग्रँड रिसेप्शन होईल. आनंद दिल्लीचा राहणारा आहे यामुळे रिसेप्शन तिथेच ठेवण्यात आलेय. लग्नानंतर सोनम आणि आनंद लंडनला जातील. सोर्सेजनुसार, आनंदने लंडनच्या नॉटिंग हिलमध्ये दोन बेडरुमचे एक घर खरेदी केलेय. लग्नानंतर दोघंही तिथेच शिफ्ट होणार आहेत.


मुंबईला येत जात राहिल सोनम...
- रिपोर्ट्सनुसार लग्नानंतर सोनम चित्रपटात काम करत राहणार आहे. यामुळे तिचे मुंबईत येणे जाणे सुरु राहिल. लग्न झाल्यानंतर सोनम लगेच चित्रपटाची शूटिंग सुरु करेल. सध्या 'वीरे दी वेडिंग' या तिच्या आगामी चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. हा चित्रपट 1 जूनला रिलीज होईल.

 

सुरुवातीला स्विटजरलँडमध्ये होणार होते लग्न 
- रिपोर्ट्सनुसार, लग्नात 150 लोक सहभागी असतील. एवढ्या लोकांना स्विट्जरलँडला घेऊन जाण्यास अनेक अडचणी येत होत्या. यासोबतच घरातील वयस्करांना तिथे घेऊन जाण्यास अडचणी येतात. याच कारणामुळे लग्न मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सेलेब्सला पाठवले इन्विटेशन...
- वृत्तांनुसार लग्न बांद्रा किंवा जुहूच्या एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये होऊ शकते. सध्या दीपिका पदुकोण, करीना कपूर आणि रणबीर कपूर यांना लग्नाचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

 

फराह खान कोरियोग्राफ करणार संगीत सेरेमनी
- रिपोर्ट्सनुसार प्रसिध्द कोरियोग्राफर फराह खान संगीत सेरेमनी कोरियोग्राफ करणार आहे. याच्या रिहर्सल कपूर रेसिडेंसमध्ये सुरु झाल्या आहेत. यामध्ये सोनमचे आईवडील अनिल आणि सुनीता कपूर स्पेशल अॅक्ट परफॉर्म करतील. यासोबतच सोनमचे काही कजिन त्यांच्याच गाण्यावर परफॉर्म करतील. संगीत सेरेमनीमध्ये सोनमही स्पेशल परफॉर्मेंस देणार आहे.

 

फॅशन ब्रांडचा मालक आहे आनंद...
सोनम कपूर दिर्घकाळापासून दिल्ली बेस्ड बिजनेसमन आनंद आहूजासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते सीक्रेटली डेटिंग करत आहेत. हे दोघं कधी इव्हेंट्समध्ये तर कधी लंडन व्हॅकेशन्सवर दिसत असतात. आनंद फॅशन ब्रांड Bhane चा मालक आहे. त्याने व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतलेय. Bhane सोनमचा फेव्हरेट फॅशन ब्राड्समधून एक आहे. अनेक वेळा ती Bhane च्या डिझाइन्स कॅरी करते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सोनम कपूर आणि बॉयफ्रेंड आनंद आहूजाचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...