आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sony PIX Premiere Nights Hits With The Premiere Of Jurassic World : Fallen Kingdom

असा पार पडला ज्युरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम’चा प्रीमियर, सेलिब्रेटींची मुलांसह उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डायनो पार्क सर्वप्रथम सोनी पिक्सच्या प्रेक्षकांसाठी खुले झाल्यामुळे, ज्युरासिक वर्ल्ड: फॉलन किंगडम हा सर्वाधिक प्रतिक्षित हॉलिवूड चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच, डरकाळ्या फोडणाऱ्या डायनोसरची झलक बॉलिवूड स्टार्सना त्यांच्या मुलांसह बघता आली ‘सोनी पिक्स प्रीमियर नाइट’मुळे! झायेद खान, अर्शद वारसी आदी बॉलिवूडमधील प्रख्यात व्यक्ती आणि मिनी माथूर व मारिया गोरेटी या बेस्ट फ्रेंड्स, संजय कपूर, पुरब कोहली व इतर यांसारख्या त्यांच्या निकटवर्तीयांनी डायनो पार्कचा अचंबित करणारा अनुभव घेण्यासाठी आपल्या मुलांसह हजेरी लावली.

 

‘सोनी पिक्स प्रीमियर नाइट्स’ स्क्रीनिंगला छोट्या पडद्यावरील अनेक ताऱ्यांनीही उपस्थिती लावली. मोहित सेहगल, सनाया इराणी, करणवीर बोहरा, इक्बाल खान, रिद्धी डोग्रा, मानवी गागरू, नवीन कस्‍तुरिया ही यातील काही नावे. ‘सोनी पिक्स प्रीमियर नाइट्स’ हा हॉलिवूड चित्रपटांचा सर्वोत्कृष्ट प्रत्यक्ष (ऑन-ग्राउंड) सोहळा असून येथे नवीन हॉलिवडपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांना बघता येतात. सोनी पिक्समुळे ज्युरासिक वर्ल्डच्या चाहत्यांना भारतात चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच त्याचा आनंद लुटता आला!

ज्युरासिक वर्ल्ड : फॉलन किंगडम हा ज्युरासिक फ्रँचायझीमधील पाचवा चित्रपट असून ज्युरासिक वर्ल्ड फ्रँचायझीमधील दुसरा चित्रपट आहे. यात ख्रिस प्रॅट आणि ब्रिस डलास हॉवर्ड यांच्या भूमिका आहेत. १९९३ मध्ये स्टीव्ह स्पीलबर्गच्या ज्युरासिक पार्क या चित्रपटासोबत सुरू झालेली ही फ्रँचायझी आता तुफान वाढली आहे आणि जगभरातील चित्रपटप्रेमींची ती सर्वाधिक आवडती चित्रपट मालिका आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रिमीयरला उपस्थित सेलिब्रेटींचे खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...