आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wax Statue मेजरमेंट दिल्यानंतर सूरमा दिलजीत दोसांझ म्हणाला- फायनली हा दिवसही आला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड : हॉकी प्लेअर संदीप सिंह यांच्या बायोपिकची सुरुवात धिम्या गतीने झाली आहे. तरीही पंजाबी पुत्तर म्हणजेच दिलजीत सिंहने सर्वांची मनं जिंकली आहेत. चित्रपट रिलीजसोबत मादाम तुसाद म्यूझियमने त्याचा व्हॅक्स स्टॅच्यू बनवण्याची घोषणाही केली होती. यासाठी रविवार 15 जुलै रोजी दिलजीत दोसांझचे बॉडी, हेअर आणि आय मेजरमेंट घेण्यात

आले. दिलजीतने मेंजरमेंट दरम्यानचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.


फायनली हा दिवस आला
या फोटोजमध्ये मेजरमेंट आर्सिस्ट दिलजीत दोसांजच्या डोळ्यांचा रंग मॅच करताना दिसत आहे. तर दूस-या फोटोमध्ये दिलजीतचे फोटो, आय बॉल्स आणि हेअर सॅम्पल पाहायला मिळत आहेत. दिलजीतने यासोबत कॅप्शन लिहिले की, - फायनली हा दिवसही आलाच.
- सूरमा चित्रपटात संदीप सिंहप्रमाणे दिसण्यासाठी आणि खेळण्यासाठी दिलजीतने प्रचंड घाम गाळला होता.

 

दूस-या दिवशीचे कलेक्शन 8.25 कोटी
शुक्रवारी द एंट मॅनसोबत रिलीज झाल्यामुळे सूरमाला चांगला स्टार्ट मिळू शकला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी अवघ्या 3.20 कोटींचा बिझनेस केला. तर दूस-या दिवशी सूरमाने 5.05 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच दोन्ही दिवसांचे कलेक्शन मिळून एकुण 8.25 कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. 
- या चित्रपटात दिलजीतसोबतच अंगद बेदी, तापसी पन्नू, विजय राज हे महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत.


अजूनही अनेक कलाकार
तुसाद म्यूझियममध्ये दिलजीतपुर्वी विराट कोहली, रणबीर कपूर, सलमान खान आणि शाहरुख खानचा स्टॅच्यूही उपलब्ध आहे. मादाम तुसादने इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपट रिलीज होण्याच्या दिवशी म्हणजे 13 जुलैला दिलजीतचे मेजरमेंट घेणार असल्याची हिंट दिली होती.
 

बातम्या आणखी आहेत...