आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Soorma':ओपनिंग डेला दिलजीतच्या 'सूरमा'ने कमावले 3.25 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'संजू'नंतर हॉकी प्लेअर संदीप सिंह यांचा बायोपिक 13 जुलैला रिलीज झाला. दिलजीत दोसांझने या चित्रपटात संदीप सिंहची भूमिका साकारली आहे. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.25 कोटींची कमाई केली आहे. अनेक ट्रेड एनालिस्टने अंदाज वर्तवला होता की, सूरमा चित्रपट पहिल्या दिवशी 2.5-3 कोटींचा बिझनेस करेल. चित्रपट समिक्षकांचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे वीकेंड कलेक्शन 10-12 कोटीच्या आसपास पोहोचण्याचा अंदाज आहे. नॉर्थ इंडियामध्ये चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त राहिली.
- सूरमा चित्रपटात तापसी पन्नू, अंगद बेदी, सिद्दार्थ शुल्का आणि विजय राजने प्रमुख भूमिका साकारल्या आहे. दोन तास 11 मिनिटांचा हा चित्रपट बनवण्यासाठी 30 कोटींचा खर्च आला आहे. सूरमाला भारतात 1100 आणि ओवेरसीजमध्ये 335 स्क्रीन्समध्ये रिलीज केले गेले आहे. 

 

Ant Man And the Wasp सोबत स्पर्धा
- सूरमाची स्पर्धा हॉलीवूडचा Ant Man And the Wasp चित्रपटासोबत होत आहे. पेटन रीडच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 5 कोटी 50 लाखांची जबरदस्त कमाई केली.

 

सूरमा पाकिस्तानमध्येही रिलीज 
- पाकिस्तानमध्ये 14 जुलैला हा चित्रपट रिलीज करण्यात आला. रिपोर्टनुसार 80 टक्के पाकिस्तानी स्क्रीन्सवर चित्रपट रिलीज केला गेला आहे. तेथे चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली. 
- 19 जुलै रोजी सुरमा चित्रपट कुवैतमध्ये विदआउट कट आणि बदल न करता रिलीज केला जाणार आहे.
- दिग्दर्शक शाद अली यांनी सूरमा चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. भारतीय हॉकीचे ड्रॅग फ्लिकर संदीप सिंह यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
- शादर अलीने बंटी और बबली सारखे चित्रपट बनवले आहेत. सूरमा हा एक प्रेरणादायी चित्रपट आहे. हा चित्रपट फक्ट भारतीयांसाठी नाही तर प्रत्येक देशातील व्यक्तीला मोटीवेट करणारा चित्रपट आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...