आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Soorma' चित्रपटासाठी दिलजीत दोसांझने संदीप सिंह यांच्याकडून घेतली ट्रेनिंग, 12 तास खेळत होता हॉकी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: भारतीय हॉकीपटू सदीप सिंह यांचा बायोपिक 'सूरमा' 13 जुलैला रिलीज झाला. चित्रपटात संदीप यांची भूमिका अभिनेता दिलजीत दोसांझ साकारत आहे. 'सूरमा' मध्ये संदीप सिंहची भूमिका साकारण्यासाठी दिलजीत दोसांझला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्याला एथलीट सारखी बॉडी बनवायची होती. दिलजीतने स्वतःला पुर्णपणे एथलीटमध्ये बदलले. संदीपचे सिग्नेचर हॉकी मूव्ह शिकण्यासाठी दिलजीतने नियमित 12 तास प्रॅक्टिस केली. स्वतः संदीप सिंह यांनी दिलजीतला ट्रेनिंग दिली. जवळपास 4 महिने संदीप आणि दिलजीतने एकत्र वेळ घालवला. चित्रपटासाठी दिलजीतने सिक्स पॅक ऐब्सही बनवले.


- संदीपप्रमाणे ड्रॅग फ्लिकर बनण्यासाठी दिलजीतने एक महिना निमयित हॉकी स्टिक पकडणे, मैदानात उभे राहणे, शॉट लावणे आणि ड्रॅग फ्लिक करण्याची प्रॅक्टिस केली. संदीप स्वतः दिलजीतकडून 12 तास, अंगद बेदीकडून 3 तास आणि तापसी पन्नूकडून 4-5 तास हॉकी प्रॅक्टिस करुन घ्यायचे. दिलजीतने सकाळी लवकरच उठणे आणि झोपण्याचे रुटीन बनवले होते.
- रुटीन फॉलो करत तो पुर्ण शूटिंग दरम्यान लवकर झोपत होता आणि सकाळी लवकर उठून हॉकीच्या प्रॅक्टिससाठी निघायचा. दिलजीतने संदीपचे मॅच आणि मुलाखत पाहत त्यांच्याप्रमाणे बोलण्याची आणि चालण्याची ट्रेनिंग घेतली. 
- दिलजीतने संदीपचा भाऊ विक्रमजीत, वडील गुरचरन सिंह आणि आई दलजीत कौरसोबतच त्यांच्या मित्रांसोबतही वेळ घालवला.
- गेल्या काही दिवसांपुर्वीच दिलजीत संदीप सिंहच्या घरीही गेला होता. येथे त्यांच्या वडिलांनी हॉकी गिफ्ट केली या हॉकी स्टिकने संदीपने अनेक गोल केले आहेत.
- संदीपही बायोपिक रिलीज होण्यापुर्वी त्यांच्यावर ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार झाले होते तिथे गेले. ज्या ट्रेनमध्ये त्यांना गोळी लागली, त्यामधून त्यांनी 12 वर्षांनंतर प्रवास केला.
- डायरेक्टर शाह अली यांचा सूरमा चित्रपट 13 जुलैला रिलीज झाला आहे. चित्रपटात दिलजीतसोबत तापसी पन्नू, अंगद बेदी, सिध्दार्थ शुक्ला, कुलभूषण खरबंदा, विजय राज प्रमुख भूमिकेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...