आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Soorma: पोलिसांकडून चुकीने गोळी लागल्याने उध्वस्त झाले करिअर, पुन्हा उभा राहिला हा खरा 'सुरमा'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : 'सुरमा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा आहे भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्याची. एक असा खेळाडू जो हॉकीच्या मैदानावर चमकला, तो कोसळला आणि पुन्हा एकदा नव्या दमाने उभा राहिला. संदीप सिंहच्या आयुष्यात घडलेल्या एका दुर्घटनेने त्यांचे आयुष्य कसे बदलून जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात संदीप सिंह यांची भूमिका पंजाबी चित्रपटांचा सुपरस्टार दिलजीत दोसांझ साकारत आहे. तर तापसी पन्नू या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

 

हॉकी खेळण्यास अशी झाली सुरुवात
संदीप यांना लहानपणी हॉकी खेळायची आवड नव्हती. त्यांचा मोठा भाऊ हॉकी खेळायचा. संदीप यांना कपडे आणि बुट हवे होते. यामुळे घरचे म्हणाले की, यासाठी तुला हॉकी खेळावं लागेल. आणि मग सुरु झाला. संदीप सिंह यांचा अविश्वसनीय प्रवास...2003 मध्ये पहिल्यांदा संदीप यांना भारतीय टीममध्ये स्थान मिळाले. 2004 मध्ये ते इथेन्स ऑलेम्पिकमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे वय होते अवघे 17 वर्षे. संदीप हॉकीमध्ये नवनवीन उंची गाठत होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक वाईट वळण आले आणि त्यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले.

 

पोलिसांकडून चुकीने गोळी लागली आणि सर्व काही उध्वस्त
22 ऑगस्ट 2006 रोजीची ही घटना आहे. जर्मनीमध्ये होणा-या वर्ल्डकपच्या ट्रेनिंग टीममध्ये सहभागी होण्यासाठी संदीप हे कालका शताब्दी एक्सप्रेसमधून दिल्लीला रवाना होत होते. तेव्हाच संदीप यांच्या कानात मोठा आवाज होतो. संदीप यांच्या मनक्याच्या हाडात गोळी लागते. संदीप हे किंचाळतात. त्यांना वाटते की, खुप मोठा स्फोट झाला आहे. तेवढ्यात एक व्यक्ती मागून येतो आणि म्हणतो की, ही गोळी चुकून झाडली गेली आहे. गोळी लागताच संदीप हे पॅरेलाइज होतात. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही आता कधीच हॉकी खेळू शकणार नाही.  

 

अशक्य गोष्टीला शक्य करुन दाखवतात संदीप

संदीप हॉकी कधीच खेळू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितलेले असते. परंतू हा खसा 'सुरमा' वेगळ्यात मातीचा बनलेला असतो. त्यांनी डॉक्टरांना हॉस्पिटलच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले. भावाला फोन केला आणि हॉकी स्टीक मागवून घेतली. ही हॉकी स्टीक घेऊन ते झोपत असतं. नंतर याच हॉकी स्टीकच्या मदतीने ते उभे राहण्याचा प्रयत्न करु लागले. ज्या हॉकी स्टीकने त्यांनी मैदानं जिंकले होते. त्याच हॉकी स्टीकच्या मदतीने त्यांनी हॉस्पिटलचेही मैदान मारले. मग ते अंथरुणावरुन व्हिल चेअरपर्यंत पोहोचले. यानंतर रिहॅबसाठी ते विदेशात गेले. जवळपास 6 महिन्यांनंतर ते परतले तेव्हा ते पायांवर उभे होते. 2008 मध्ये त्यांनी पुन्हा हॉकी खेळणे सुरु केले. 2008 च्या सुलतान अजलान शाह कपच्या माध्यमातून संदीप यांनी धमाकेदार कमबॅक केले. यावेळी त्यांनी 8 गोल करुन टॉप स्कोर केला. 


2009 मध्ये भारतीय संघाचे कर्णधार
कधीच हॉकी खेळू शकणार नाही असे बोलले जाणा-या खेळाडूला 2009 मध्ये भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आली. त्यांच्या कर्णधार पदाच्या कार्यकाळात टीमने तब्बल 13 वर्षांनंतर अजलान शाह कप जिंकला. संदीपच्या नेतृत्त्वाखाली टीम यशस्वी होत गेली. ते इतिहास रचत राहिले. याच वेळी त्यांनी त्यांचा आयडॉल धनराज पिल्ले यांच्या 121 गोलचा रेकॉर्ड मोडला. यासोतबच 145 किलोमीटर वेगाने ड्रॅग फ्लिक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. आता 'सूरमा' या चित्रपटात संदीप आपल्या आयुष्याची अविश्वसनिय कथा घेऊन येत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...