आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीची आपबिती, \'निर्माता म्हणाला होता, आम्ही पाच जण आहोत, आपापसांत तुला एक्सचेंज करत राहू\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कास्टिंग काऊच हे चित्रपटसृष्टीतील एक कटू सत्य आहे. या इंडस्ट्रीत काम करत असताना अनेक अभिनेता-अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता यात आणखी भर पडली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री श्रुती हरिहरन हिलादेखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. अलीकडेच हैदराबाद येथे झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये श्रुती 'चित्रपटसृष्टीतील सेक्सिज्म' या विषयावर झालेल्या चर्चासत्रात सहभागी झाली होती. यावेळी बोलताना तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. या चर्चासत्रात श्रुतीसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष आणि फिल्म एटिडर बिना पॉल सहभागी झाल्या होत्या. चर्चा सत्रात जेव्हा कास्टिंग काऊचचा विषय निघाला, तेव्हा श्रुतीने तिचे अनुभव शेअर केले. 


18 वर्षांची असताना केला होता पहिल्यांदा कास्टिंग काऊचचा सामना...
या चर्चासत्राक श्रुतीने सांगितले, की ती जेव्हा 18 वर्षांची होती, तेव्हा पहिल्यांदा ती कास्टिंग काऊचला सामोरे गेली होती. श्रुती तिच्या पहिल्या कन्नड चित्रपटाच्या मीटिंगसाठी गेली होती. त्यावेळी तिला अतिशय वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे ती पुरती कोलमडून गेली होती. तिने तिच्यासोबत घडलेली हकीकत तिच्या कोरिओग्राफरला सांगितली, तेव्हा त्याची प्रतिक्रिया अचंबित करणारी होती. त्याने श्रुतीला म्हटले होते, की “जर तुला या गोष्टी हाताळता येणार नसतील, तर याक्षणी हे काम सोडून दे.” या घटनेनंतर श्रुती तो चित्रपट साइन केला नव्हता. 

 

पुढे वाचा, चार वर्षांनी श्रुतीसोबत पुन्हा घडली अशीच एक घटना...