आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीने लावले कास्टिंग काउचचे आरोप, म्हणाली- गेस्ट हाउसमध्ये एकटीला बोलवायचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क : गेल्या काही महिन्यांपासून Me too कॅम्पेनच्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाच्या घटना सर्वांसमोर मांडल्या आहेत. या मूव्हमेंटनंतर अनेक प्रभावशाली लोकांचे कृत्य समोर आले. भारतातही ही मूव्हमेंट प्रभावी ठरतेय. साउथ अॅक्ट्रेसेस अशा घटना सर्वांसमोर मांडतत आहेत. काही दिवसांपुर्वीच साउथ इंडियन अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचे आरोप लावले होते. यानंतर अजून एक साउथ अॅक्ट्रेस आमानीने कास्टिंग काउचचे आरोप लावले आहेत. आमानी अनेक तामिळ आणि तेलुगू चित्रपटात दिसली आहे.
ती म्हणाली की, मी माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काउच सारख्या गोष्टी फेस केल्या आहेत. मला काही नवीन प्रोडक्शन कंपन्यांचे फोन येत होते. ते लोक मला एकटीला गेस्ट हाउसमध्ये बोलवायचे. मी नेहमी माझ्या आईसोबत ऑडिशनसाठी जायचे. तेव्हा ते लोक मला एकटे बोलवायचे. तेव्हा खुप विचित्र वाटायचे. नंतर मला कळाले की, या फोन कॉल्सचा अर्थ काय आहे. तिने सांगितले की, जेव्हा असे फोन कॉल्स यायचे तेव्हा कळून अंदाज यायचा की, हा फोन कशामुळे आला आहे. आमानीने सांगितले की, तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. परंतू कधी एखाद्या मोठ्या प्रोडक्शन हाउस किंवा मोठ्या फिल्ममेकर्सकडून अशा काही ऑफर आल्या नाहीत. फक्त नव्या प्रोडक्शन हाउसेसने तिच्यासोबत कास्टिंग काउच सारखे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...