आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानपणी अशा दिसायच्या श्रीदेवीच्या मुली, आता दिसतो Glamours Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची 'चांदणी' श्रीदेवीने जगाचा निरोप घेतलाय. वयाच्या 54 व्या वर्षी तिची प्राण ज्योत मालावली. दुबईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. श्रीदेवीच्या मृत्यू समयी बोनी कपूर आणि खुशी श्रीदेवी सोबत होते. करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तिने अॅक्टींगमधून सर्वकाही मिळवले आहे. पण व्यावसायिक आयुष्याबरोबरच ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत राहिली आहे.

 

लग्नापूर्वी प्रेग्नंट होती.. 
श्रीदेवीचे नाव वेळोवेळी तिच्या सहकारी कलाकारांबरोबर जोडले गेले होते. एक काळ तर असा होता की, श्रीदेवी आणि मिथुन यांच्या अफेअर्सचे किस्से चांगलेच गाजत होते. पण श्रीदेवीने 1996 मध्ये तिचे फॅन्स आणि फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांना धक्का देत तिने 8 वर्षे मोठ्या असलेले निर्माते बोनी कपूर यांच्याशी विवाह केला होता. श्रीदेवीला हा विवाह टाळायचा होता, पण काहीतरी असे घडले की, तिला हा विवाह करावाच लागला असे सांगितले जाते. श्रीदेवी लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होती अशाही चर्चा आहेत. त्या काळात आलेल्या बातम्यांनुसार लग्नाच्या वेळी श्रीदेवी ही प्रेग्नंट होती.

 

जाह्नवी आणि खुशी..
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या दोन मुली आहेत. एक जान्हवी आणि दुसरी खुशी कपूर. विशेष म्हणजे श्रीदेवी बोनी कपूर यांची दुसरी पत्नी होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मोना सुरी कपूर होते. त्यांना एक मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला आहेत.

 

या शाळेत शिकतात मुली..
श्रीदेवीच्या दोन्ही मुली बॉलीवूडच्या सर्वात पॉप्युलर स्टार किड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर नेहमी त्यांचे फोटो व्हायरल होत असतात. 21 वर्षांची जान्हवी सध्या बॉलिवूड चित्रपटात पदार्पणाच्या तयारीत आहे. 'धडक' या चित्रपटातून ती लवकरच पदार्पण करणार आहे. मोठ्या बहिणीप्रमाणेच खुशी कपूर सध्या शिक्षण घेते आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवी आणि तिच्या दोन्ही मुलींचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...