आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने घेतला जगाचा निरोप, पाहा बालपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. श्रीदेवी पति बोनी कपूर आणि लहान मुलगी खुशीसोबत रविवारी दुबईमध्ये मोहित मारवाहच्या लग्नात गेल्या होती. तिथेच त्यांनी जगाचा निरोप घेतला. श्रीदेवीच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसोबतच त्यांच्या फॅन्सला धक्का पोहोचलाय. सुत्रांनुसार श्रीदेवीच्या मुंबई येथील घरात लोक येणे सुरु झाले आहे. येथे ते जान्हवीला आधार देत आहेत. 'धडक' या चित्रपटाच्या शेड्यूलमुळे जान्हवी कुटूंबियांसोबत दुबईला जाऊ शकली नव्हती.

 

शेवटच्यावेळी या चित्रपटात दिसली श्रीदेवी
अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेली श्रीदेवी शेवटच्या वेळी 'मॉम' या चित्रपटात झळकली होती. यापुर्वी 2012 मध्ये आलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' चित्रपटात दिसल्या होत्या. 1983 मध्ये आलेल्या 'हिम्मतवाला' चित्रपटातून श्रीदेवी एका रात्रीत स्टार बनली होती. यानंतर श्रीदेवीने मागे वळून पाहिले नाही. 


दिल्या अनेक सुपहिट फिल्म
श्रीदेवीने 'सोलहवां सावन' (1978), 'हिम्मतवाला' (1983), 'मवाली' (1983), 'तोहफा' (1984), 'नगीना' (1986), 'घर संसार' (1986), 'आखिरी रास्ता' (1986), 'कर्मा' (1986), 'मि. इंडिया' (1987), लाडलासोबतच अनेक बॉलिवूड चित्रपट केले. श्रीदेवीने फिल्म प्रोड्यूसर बोनी कपूर यांच्यासोबत 1996 मध्ये लग्न केलेहोते. 'मि. इंडिया' चित्रपटापासून त्यांच्या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. श्रीदेवीने बोनी कपूरसोबत लग्न करुन आपले फॅन्स आणि इंडस्ट्रीच्या लोकांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवीचे बालपणापासून ते आतापर्यंतचे निवडक फोटोज..

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...