आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या क्षणी मुलीचा चेहराही पाहू शकली नाही श्रीदेवी, दुबईमधून आली मृत्यूची बातमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीने वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आपला भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी त्या दुबईमध्ये गेल्या होत्या. परंतू या आनंदच्या क्षणावर श्रीदेवीच्या अचानक मृत्यूने दुःखाचे डोंगर कोसळले. यापेक्षा जास्त दुःखाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी शेवटच्या क्षणी मुलगी जान्हवी कपूरचा चेहराही पाहू शकली नाही. विशेष म्हणजे श्रीदेवीचे संपुर्ण कुटूंब दुबईमध्ये होते. परंतू जान्हवी 'धडक' चित्रपटाच्या शूटिंगमुळे दुबईला जाऊ शकली नव्हती.

- श्रीदेवीचा दिर आणि बोनी कपूरचा भाऊ संजय कपूरने शनिवारी दुबईमधून मुंबईमध्ये पोहोचता श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी सांगितली.
- हे सांगितल्यानंतर ते पुन्हा दुबईला परतले. एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार संजय यांनी सांगितले की, "हो, श्रीदेवी या जगात नाही हे खरे आहे. मी दुबईमधून आलोय. आता पुन्हा दुबईमध्ये परतणार आहे. रात्री 11: 00-11:30 वाजता श्रीदेवीचा मृत्यू झाला. या पेक्षा जास्त माहिती माझ्याजवळ नाही."
- संजय जान्हवीला दुबईला घेऊन गेले की नाही याची माहिती अजून समोर आलेली नाही.


मोनासारखेच आहे श्रीदेवीचे नशीब
- बोनी कपूर यांच्या पहिली पत्नी मोनाप्रमाणेच श्रीदेवीही आपल्या मुलीचा पहिला चित्रपट पाहू शकली नाही. हा चित्रपट जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.
- विशेष म्हणजे 2012  मध्ये मोना शौरी कपूरचा मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा अर्जुन कपूरचा 'इशकजादे' हा पहिला चित्रपट त्या पाहू शकल्या नव्हत्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा जान्हवी आणि श्रीदेवीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...