आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत पोहोचल्यानंतर येथे ठेवले जाणार श्रीदेवी यांचे पार्थिव, भारतात पोहोचण्यास होतोय विलंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाग्य बंगलोमध्ये वर्तुळात दाखवलेल्या ठिकाणी ठेवले जाणार श्रीदेवी यांचे पार्थिव - Divya Marathi
भाग्य बंगलोमध्ये वर्तुळात दाखवलेल्या ठिकाणी ठेवले जाणार श्रीदेवी यांचे पार्थिव

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे निधन हृदयविकारानेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांनी दुबईत अखेरचा श्वास घेतला. शेवटच्या क्षणी पती बोनी कपूर त्यांच्यासोबत होते. बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशीसोबत श्रीदेवी फॅमिली वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला गेल्या होत्या. आज दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. दुबईत सुरु असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे त्यांचे पार्थिव भारतात पोहोचण्यास विलंब होतोय. मुंबईतील भाग्य बंगलो येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.  


शुभ्र फुलांमध्ये विसावणार श्रीदेवी... 
- मुंबईतील विले पार्लेस्थि पवनहंस मुक्तिधाम येथे श्रीदेवी यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, सर्व वस्तू शुभ्र रंगाच्या असणार आहेत.
- पांढरा हा श्रीदेवी यांचा आवडता रंग होता. अंतिम निरोप देताना सगळं काही पांढ-या रंगाचे असावे, अशी इच्छा एकदा त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून बोलून दाखवली होती. याच कारणामुळे अंत्ययात्रेत वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही पांढ-या रंगाची असेल. अंत्ययात्रेसाठी पांढ-या रंगाची फुले मागवण्यात आली आहेत.


भारतात पोहोचण्यास होतोय विलंब?
- दुबईत एकाद्या परदेशी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर तेथील कायदेशीर प्रक्रियेला एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतो.
- पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर डेथ सर्टिफिकेट दिले जाते. यूएईमध्ये भारतीय दुतावास नवदीप सूरी आणि दुबईतील भारतीय दुतावास विपुल तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहेत. 


पुढे बघा, विले पार्लेस्थित पवनहंस मुक्तिधामध्ये सुरु आहे अंत्यविधीची तयारी...  

बातम्या आणखी आहेत...