आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल अंबानी यांच्या प्रायव्हेट जेटने मुंबईत आणण्यात येईल श्रीदेवी यांचे पार्थिव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई/मुंबई- बॉलीवूडची ‘चांदनी’ आणि ‘हवा हवाई गर्ल’ श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये दुख:चे वातावरण पसरले आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव सोमवारी दुपारपर्यंत मुंबईत आणण्यात येईल.

 

gulfnews.com ने दिलेल्या वृत्तानुसार आशियाचे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी श्रीदेवी यांचा पार्थिव देह भारतात आणण्यासाठी आपले प्रायव्हेट जेट ऑफर केले आहे. याच वेबसाइटने सांगितले की, श्रीदेवी ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्याच हॉटेलच्या बाथरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळला.


अनिल अंबानींच्या प्रायव्हेट जेटने आणण्यात येईल पार्थिव...?
यूएईचे सर्वात मोठे वृत्तपत्र ‘गल्फ न्यूज’ ने श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला प्राथमिकता दिली आहे. वृत्तपत्राने आपल्या वेबसाइटवर सुत्रांचा हवाला देत लिहिले आहे की, अनिल अंबानींनी श्रीदेवी यांचेय पार्थिव भारतात आणण्यासाठी आपले प्रायव्हेट जेट ऑफर केले आहे. परंतु, अद्याप या बातमीला दुजोरा मिळू शकलेला नाही.


बाथरूममध्ये सापडला मृतदेह....
श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी यांच्यासोबत ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, त्या होटेलच्या बाथरूममध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. गल्फ न्यूजने हॉटेलच्या सुत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, या बाबीवर संशय आहे की, रात्री त्यांना वॉशरूममध्येच ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्या तेथेच कोसळल्या. या हॉटेलचे नाव अमरित टॉवर आहे. प्रसिद्ध हॉटेलिंग ग्रुप जुमैरा द्वारे हे हॉटेल ऑपरेट करण्यात येते.  

- श्रीदेवली यांचे पार्थिव हॉटेलहून थेट दुबईच्या अल घुसैलमधील पोलिस हेडक्वॉर्टरमध्ये नेण्यात आले आणि येथील मोर्गमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर पोस्टमार्टम करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...