आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी मृत्यूप्रकरण : दुबईमध्ये प्रसार माध्यमांवर भडकले भारतीय राजदूत, म्हणाले 'चुक करत आहात'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईमधून मुंबईमध्ये कधीपर्यंत येणार हे सध्या सांगणे अवघड आहे. यूएईमध्ये भारताचे एम्बेसडर नवदीप सूरी यांच्यानुसार दुबई पोलिसांची मंजूरी मिळाल्यानंतरच पार्थिव कुटूंबाकडे सुपूर्त करता येईल. दुबईमध्ये कायदेशीर प्रक्रिया सुरु असल्यामुळे पार्थिव भारतात आणण्यास उशीर होत आहे.  


मृत्यूच्या कारणांचे अंदाज चुकीचे ठरवले
एम्बेसडर नवदीप सूरी यांनी सोमवारी रात्री ट्वीट करुन श्रीदेवीच्या मृत्यूवर लावल्या जाणा-या अंदाज रद्द केलेय. ते म्हणाले की, श्रीदेवींच्या अचानक झालेल्या मृत्यूला प्रसारमाध्यमे इंट्रेस्टींग बनवून सादर करत आहेत. परंतू असे अंदाज वर्तवल्याने काहीच मदत मिळणार नाही. प्रसारमाध्यमे चुक करत आहेत. त्यांनी लिहिले की,  श्रीदेवींची डेड बॉडी लवकर भारतात पाठवता यावी म्हणून आम्ही स्थानिक प्रशासनासोबत मिळून प्रयत्न करत आहोत. येवढेच नाही तर श्रीदेवीच्या कुटूंबासोबत आम्ही सतत संपर्कात आहोत. त्यांनी लिहिले की, मागच्या काही केसेसच्या अनुभवावरुन समजते की, या प्रक्रियेला 2-3 दिवस लागतातच. ते म्हणाले की, मृत्यूचे कारण शोधण्याचे काम एक्सपर्ट्सचे आहेत, हे त्यांनाच करु द्यावे.

 

बाथटबमध्ये बुडाल्यामुळे झाला मृत्यू 
श्रीदेवींचे पार्थिव मंगळावारी मुंबईमध्ये आणण्याचा अंदाज वर्तवला जातोय. फॉरेंसिक रिपोर्टमध्ये सोमवारी खुलासा करण्यात आला की, त्यांचा मृत्यू कार्डिएक अरेस्टमुळे नाही तर बाथटबमध्ये बुडाल्यामुळे झाला. आता पोलिसांनी हे प्रकरण पब्लिक प्रॉसिक्यूशनवर सोपवले आहे. त्यांच्या परवाणगीनंतरच पार्थिव भारतात पाठवले जाईल. तर एकीकडे बातम्या येत आहेत की, श्रीदेवींच्या मृत्यूच्या वेळी बोनी कपूर हॉटेलच्या रुममध्ये होते. याविषीय पोलिस विचारपूस करत आहेत. शनिवारी संध्याकाळी दुबईच्या हॉटेलमध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवींचे काही फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...