आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevi Honoured At Cannes 2018: Jhanvi Aur Boney Not Reached But Subhash Ghai Takes Award

श्रीदेवीला कानमध्ये मिळाला सन्मान, परंतू स्विकारण्यासाठी पोहोचले नाही बोनी आणि मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : काही दिवसांपुर्वी वृत्त आले होते की, श्रीदेवीच्या मृत्यूनंतर त्यांना कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित केले जाईल. यासाठी त्यांनी बोनी कपूर आणि त्यांच्या मुली खुशी-जान्हवी कानमध्ये जाऊन सन्मान स्विकारतील. परंतू असे झाले नाही. फिल्म मेकर सुभाष घईने हा पुरस्कार स्विकारला. श्रीदेवीला कानमध्ये मंगळवारी स्पेशल सलूट देत 'रीगनॉल्ड एफ लुइस फिल्म ऑनर्स' चा सन्मान देण्यात आला. हे घेण्यासाठी कपूर कुटूंबिय पोहोचले नाहीत. सुभाष घई यांनी हा पुरस्कार स्विकारला. 


सुभाष घई म्हणाले अवॉर्ड रिसिव्ह करणे म्हणजे सन्मान
- श्रीदेवींचा हा सन्मान स्विकारल्यानंतर सुभाष घईने ट्विट केले.
- त्यांनी लिहिले "It was an honour to receive award on behalf of legend @SrideviBKapoor at @Festival_Cannes yesterday for her outstanding contribution in indian cinema and shared my experience with impeccable inimitable actor to western audience hosted by Titan Reginald F. Lewis film honours."।
- कानमध्ये श्रीदेवीला हा अवॉर्ड देण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा बोनी कपूर म्हणाले होते की, "श्रीदेवीच्या कामाला जगभरात सन्मान आणि मान्यता दिली जातेय यामुळे खुप खुश आहे. श्रीदेवीची कमतरता नेहमीच जाणवत राहिल. परंतू आपल्या कामातून त्या जिवंत आहेत."

-सुभाष घईने 'कर्मा'(1986) चित्रपटातून श्रीदेवीसोबत काम केले आहे.

 

श्रीदेवींना मिळाला मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कार
- कानपुर्वी श्रीदेवीला 'मॉम' चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी बोनी कपूर मुलगी जान्हवी आणि खुशीसोबत पोहोचले होते.
- यासोबतच लॉस एंजिलिस फिल्म फेस्टिव्हल आणि ऑस्कर अवॉर्डमध्ये श्रीदेवीचे काम आणि योगदानाचा उल्लेख करण्यात आला होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुभाष घईचे ट्विट आणि पाहा श्रीदेवीला मिळालेला नॅशनल अवॉर्ड घेताना कपूर फॅमिलीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...