आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी यांच्याबद्दल ‘हा’ शब्द वापरल्याने ऋषी कपूर संतापले! असा व्यक्त केला राग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते ऋषी कपूर प्रसारमाध्यमांवर संतापले आहेत. श्रीदेवी यांच्या निधनासंदर्भात बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी ट्विटरवरून संताप व्यक्त केला. रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारस केलेल्या एक ट्विटमध्ये त्यांनी श्रीदेवींच्या निधनानंतर त्यांच्या संदर्भात वृत्तवाहिन्यांकडून वापरण्यात येणाऱ्या भाषेबद्दल ट्विटवरून आक्षेप नोंदवला. 

 

श्रीदेवींना 'मृतदेह' म्हणून संबोधले जाऊ लागले आहे का बरं असं? सर्व वृत्तवाहिन्या मृतदेह आज रात्री मुंबईत आणला जाईल, अशापद्धतीची ओळ आपल्या वार्तांकनात वापरत आहेत. (निधनानंतर) अचानक तुमची ओळख पुसली जाते आणि त्यांची ओळख फक्त मृतदेह इतकीच राहते? अशा आशयाचे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे.

 

ऋषी कपूर यांनी पहाटे केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये श्रीदेवींच्या मृत्युचा धक्का बसल्याचे म्हटले होते. या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘एका दुख:द बातमीने आजची सकाळ झाली, धक्कादायक आहे हे. आमची सहानभूती बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुलींबरोबर आहे’

 

या दोन ट्विटशीवाय त्यांनी चांदनी सिनेमातील श्रीदेवीचा एक फोटो ट्विट करत ‘यानंतर कधीच चांदण पडणार नाही. ‘चांदनी’ कायमची गेली.’ म्हटले आहे. श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विट प्रोफाइल फोटो बदलून केवळ काळा फोटो ठेवला आहे. त्याबरोबर त्यांनी ‘श्रीदेवी. आरआयपी’ असे पोस्ट केले आहे.

 

ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये ‘चांदनी’, ‘नागीन’, ‘गुरुदेव’, ‘बंजारा’, ‘कौन सच कौन झुटा’ या गाजलेल्या सिनेमांचा समावेश होतो. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, ऋषी कपूर यांचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...