आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या अकाली जाण्याने देशभरात हळहळ, मोदींसोबतच राष्ट्रपतींनी ट्वीटरवर व्यक्त केले दुःख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. दुबईमध्ये आपला भाचा मोहित मारवाहच्या लग्नात श्रीदेवी गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटवरुन श्रीदेवीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय. त्यांनी आपल्या करियरमध्ये अनेक प्रसिध्द भूमिका साकारल्या.


श्रीदेवीची मोठी मुलगी दुबईला जाऊ शकली नाही
- बोनीच्या कुटूंबातील लोक लग्नानंतर दुबईमधून परतले होते. परंतू बोनी, श्रीदेवी आणि खुशी तिथेच थांबले होते. जान्हवी कपूर आपल्या एका चित्रपटाच्या शूटिंगमुळे दुबईमध्ये जाऊ शकली नव्हती. 

 

राजकिय नेत्यांनी ट्वीटवरुन वाहिली श्रध्दांजली
- पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटवर वरुन श्रीदेवी यांना श्रध्दांजली वाहिली.

- मोदींचे ट्वीट "श्रीदेवीच्या अकाली जाण्याने दुःख झाले. बॉलिवूड करिअरमध्ये तिने अनेक वेगवेळ्या सदैव स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या. मी श्रीदेवीच्या कुटूंबाच्या दुःखात सहभागी आहे. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली. "

- यासोबतच अमिताभ बच्चन यांनीही ट्वीट करुन शोक व्यक्त केला.

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेस नेते संजय निरूपम, लेखक चेतन भगत यांनीही ट्विटरवरून श्रीदेवी यांना आदरांजली वाहिली आहे तसेच आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा राजकिय नेत्यांचे ट्वीट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...