आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाला नटवले नवरीसारखे, कुणाच्या चेह-यावर दिसल्या खुणा, बघा 19 सेलेब्सची शेवटची छायाचित्रे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी आयुष्यभर प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि आयुष्याचा निरोप घेताना सर्वांना रडवून जातात. नेहमी चर्चेत राहणा-या सेलिब्रिटींचा मृत्यू प्रेक्षकांना चटका लावून जातो. असाच चटका लावणारा मृत्यू ठरला अभिनेत्री श्रीदेवीचा.  फॅमिली वेडिंगमध्ये सहभागी होण्यासाठी श्रीदेवी या दुबईत गेल्या होत्या. पण तेथेच 24 फेब्रुवारी 2018 रोजी बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचे निधन झाले होते.

 

श्रीदेवी यांच्या निधनाचे वृत्त येताच बॉलिवूडसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. दुबईत श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले आणि 28 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवी यांना अखेरच निरोप देताना त्यांना नववधूसारखे नटवण्यात आले होते. श्रीदेवी यांच्या जाऊबाई आणि अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता कपूर आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी श्रीदेवी यांच्यासाठी शेवटची साडी खरेदी केली होती. अगदी पाच मिनिटांत त्यांचा मेकअप करण्यात आला होता. 

 

श्रीदेवी यांच्या निधनाच्या काही  दिवसांनीच आणखी एक अभिनेत्री या जगातून कायमची निघून गेली. ही अभिनेत्री म्हणजे शम्मी आंटी. वयाच्या 89 व्या वर्षी शम्मी आंटी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या कुटुंबात कुणीच राहिले नाही. अभिनेत्री आशा पारेख यांनी शेवटच्या काळात त्यांचा सांभाळ केला होता. 

 

या दोन्ही दिग्गज अभिनेत्री आज आपल्यात नाहीत, पण कलाकृतींच्या माध्यमातून त्या कायम आपल्यातच राहणार आहेत. अशाच काही नावाजलेल्या सेलिब्रिटींची त्यांच्या निधनाच्या काही क्षणानंतर क्लिक झालेली छायाचित्रे पुढील स्लाईड्सवर तुम्ही बघू शकता.  ही छायाचित्रे बघून नक्कीच या सेलिब्रिटींच्या चाहत्यांचे डाळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.  

बातम्या आणखी आहेत...