आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किन्नर-भिकारी ओळखत होते श्रीदेवींची कार, सिग्नलवर थांबताच घडायचे असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवी आता या जगात नाहीत. पण त्यांच्याशी निगडीत नवनवीन गोष्टी दररोज समोर येत आहेत. त्यांचे निकटवर्तीय त्यांच्या आठवणींना उजाळा देताना श्रीदेवींच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आणत आहेत. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी Dainikbhaskar मध्ये प्रकाशित झालेल्या 'परदे के पीछे' कॉलममध्ये श्रीदेवींशी निगडीत काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. 


मुंबईत भिकारी ओळखायचे श्रीदेवींची कार...  
'एकेदिवशी बोनी कपूर यांच्या घरी मी भेटण्यासाठी गेलो होतो आणि संध्याकाळपर्यंत मला एअरपोर्टवर पोहोचायचे होते. योगायोगाने त्यादिवशी बोनी कपूर यांची कार खराब झाली होती. त्यामुळे श्रीदेवींच्या ड्रायव्हरसोबत मी एअरपोर्टसाठी रवाना झालो. वाटेत ट्राफिक सिग्नलवर गाडी थांबत होती. गाडी थांबताच मोठ्या संख्येने किन्नर आणि भिकारी गाडीभोवती जमत होते. श्रीदेवी गाडीत नसताना कारभोवती एवढी माणसं का जमली, हे बघून मी अचंबित झालो होतो. त्यांच्याशी बोलल्यावर मला समजले, की श्रीदेवी कायम त्यांना भरपूर पैसे देत असे. श्रीदेवींच्या मनात या लोकांसाठी सहानुभूती होती.'


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या श्रीदेवी यांच्याशी निगडीत आणखी काही खास गोष्टी...  

बातम्या आणखी आहेत...