आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevi Went Washroom After 15 Minute She Didnot Come Out Boney Forcefully Opened Door

श्रीदेवीला डिनरला घेऊन जाणार होते बोनी, फ्रेश व्हायला गेल्या पण 15 मिनिटे बाहेरच आल्या नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी रात्री हार्ट अटॅकने निधन झाले. एका मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवीचे पती बोनी कपूर सरप्राइज देण्यासाठी पुन्हा एकदा दुबईत पोहोचले होते. ते त्यांना डिनरसाठी घेऊन जाणार होते. श्रीदेवी फ्रेश होण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्या पण 15 मिनिटे त्या बाहेरच आल्या नाहीत. नंतर त्या बाथटबमध्ये पडलेल्या दिसल्या. सोमवारी श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. जुहूस्थित मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

लग्नानंतर मुंबईत परतले होते बोनी कपूर...
- कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीचा दाखला देत खलीज टाइम्सने म्हटले, की बोनी कपूर लग्नात सहभागी होऊन मुंबईत परतले होते. 24 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा दुबईत आले आणि संध्याकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास जुमैरा एमिरेट्स टॉवर हॉटेलमध्ये गेले. येथेच श्रीदेवी थांबल्या होत्या. बोनी श्रीदेवी यांना सरप्राइज डिनर पार्टीसाठी घेऊन जाणार होते.
- "बोनी यांनी श्रीदेवी यांना उठवले आणि दोघांमध्ये 15 मिनिटे संवाद झाला. त्यानंतर श्रीदेवी फ्रेश होण्यासाठी बाथरुममध्ये गेल्या. पण 15 मिनिटे होऊन देखील श्रीदेवी बाहेर न आल्याने बोनी यांनी बाथरुमचे दार ठोठावले."
- "आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी धक्का देऊन दार उघडले. त्यावेळी बोनी यांनी श्रीदेवी यांना बेशुद्धावस्थेत बाथटबमध्ये पडलेले बघितले. बोनी यांनी श्रीदेवी यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या उठल्या नाहीत. त्यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली." 
- पोलिस आणि डॉक्टर हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर श्रीदेवी यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान दुबईतील भारतीय दुतावासाने श्रीदेवी यांचे पासपोर्ट रद्द केले.

 


पोलिसांनी हॉटेलचा एक मजला केला सील..
- पोलिसांनी हॉटेलचा मजला सील केला, दोन दिवस श्रीदेवी खोलीच्या बाहेरच नव्हत्या
- स्थानिक मीडियानुसार, पती आणि मुलगी मुंबईला परतल्यानंतर श्रीदेवी दुबईमधील हॉटेलच्या खोलीत एकट्याच होत्या. 
- निधनापूर्वी 48 तास त्या बाहेर आल्या नव्हत्या. शनिवारी रात्री बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत दिसल्यावर त्यांना रुग्णालयात हलवले. दुबई पोलिसांनी तपासासाठी हॉटेलचा पूर्ण मजला सील केला आहे.
- कुटुंबीयांनुसार श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास नव्हता. या स्थितीत कॉस्मेटिक शस्त्रक्रियेचा मृत्यूशी संबंध जोडला जात आहे.
- श्रीदेवींनी 29 शस्त्रक्रिया केल्या आहेत. यात एकात त्रास झाला तेव्हापासून डाएटच्या गोळ्या आणि अँटी एजिंग औषधे घेत होती.
- न्यायवैद्यक अहवालानंतरच पार्थिव कुटुंबास सोपवले जाईल. सोमवारी त्यांचे पार्थिव भारतात येणार आहे.  

 

यासाठी श्रीदेवी यांना म्हटले जाते भारताची पहिली महिला सुपरस्टार
- वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय करिअरला सुरुवात करणा-या श्रीदेवी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. 1975 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी त्या जुली या बॉलिवूड चित्रपटात बालकलाकार म्हणून झळकल्या होत्या.
- फिल्म इंडस्ट्रीत एकीकडे अभिनेत्रींचे करिअर लहान समजले जाते, तिथे श्रीदेवी यांनी तब्बल 50 वर्षे कॅमे-यासमोर घालवले.
- 50 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 300 चित्रपटांमध्ये अभिनय केला. शाहरुख खान स्टारर झिरो या आगामी चित्रपटात त्या अखेरच्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत.
- 1980 मध्ये श्रीदेवी यांच्यामुळे तामिळ चित्रपटांसाठी हिंदी डबिंग सुरु झाले.
- तीन दशकांपर्यंत श्रीदेवी तामिळ, तेलुगू आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीत नंबर 1 पोझिशनवर होत्या.
- 4 चित्रपटांसाठी श्रीदेवी यांनी गाणी गायली. हे चित्रपट होते, सदमा, चांदनी, गरजना आणि क्षणा क्षणम.
- वयाच्या 13 वर्षी रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका श्रीदेवी यांनी साकारली होती. तर वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी रजनीकांत यांच्या प्रेयसीची भूमिका वठवली होती.
- 300 चित्रपटांमध्ये तेलुगू (81), तामिळ (72), हिंदी (71) कन्नड (50), मल्याळम (26) आहेत. 
- बेस्ट अॅक्ट्रेससाठी 5 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड त्यांनी आपल्या नावी केला. 2013 मध्ये त्यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले होते. 2 दशकं त्या सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्री होत्या. 

 

 

हेही वाचा...
> समोर आला श्रीदेवीच्या पार्थिवाचा पहिला फोटो, रात्री अकराच्या सुमारास पार्थिव होणार मुंबईत दाखल

मृत्यूबाबत संशय: पोलिसांनी हॉटेलचा मजला केला सील, दोन दिवस श्रीदेवी खोलीच्या बाहेरच नव्हत्या

>बादशाह खान'ला लागली होती 'बेनझिर'च्या मृत्यूची कुणकुण?, मध्यरात्री केले होते 'हे' ट्वीट

श्रीदेवीपासून रीमा लागूपर्यंत, गेल्या वर्षभरात जग सोडून गेले हे 22 सेलेब्स

हा असेल श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट; हे आहेत या चित्रपटात त्यांचे सहकलाकार

बातम्या आणखी आहेत...