आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju लहान असतानाच वडील सुनील दत्त यांनीच दिली होती पहिली सिगारेट, हे होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: संजय दत्तला बालपणापासून सिगारेटची सवय लागली होती. परंतू पहिल्यांदा वडील सुनील दत्त यांनीच त्याला सिगारेट पिण्यासाठी दिली होती. सुनीलने मुलगा संजूला धडा शिकवण्यासाठी सिगारेट ओढण्यास दिली होती. धडा दूरच राहिला, पण संजयने आरामात पुर्ण सिगारेट ओढली होती. हे पाहून सुनील घाबरले होते की, आपला मुलगा कोणत्या वाटेवर जातोय. हा किस्सा स्वतः संजय दत्तने एका मुलाखती दरम्यान सांगितला होता. संजय दत्त यांचे आयुष्य वादग्रस्त राहिले आहे. संजय दत्तच्या आयुष्यावरील 'संजू' हा चित्रपट 29 जूनला रिलीज होत आहे. चित्रपटात संजय दत्त यांच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से पाहायला मिळतील. चित्रपटात रणबीर कपूर संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. 

संजय दत्तने मुलाखतीत सिगारेट पिण्याचा किस्सा शेअर केला. त्याने सांगितले की, त्याचे वडील काश्मीरमध्ये शूटिंग करत होते. यावेळी ते एका सीनमध्ये सीगारेट पिताना दिसले. मी हे पाहिले आणि आई नरगिसकडे हट्ट केला की, ते सिगारेट पिऊ शकतात, तर मी का नाही? हे सुनील दत्त यांना कळाले तेव्हा ते नाराज झाले. तेथील चित्रपटाच्या क्रू मेंबर्स सुनील दत्त यांना म्हटले की, दे त्याला सिगारेट प्यायला, लहान आहे, हाताला चटका बसल्यावर त्याला चांगला धडा मिळेल. सुनील दत्त यांनीही असेच केले. पेटवलेली सिगारेट माझ्या हातात दिली. तर मी ती एका झटक्यात संपवली.

 

खिडकीखाली पडलेले सिगारटेचे तुकडे प्यायचा संजू
संजयने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझ्या वडिलांना भेटायला अनेक प्रोड्यूसर घरी यायचे. लोक नेहमीच त्यांच्यासोबत बसून सिगारेट प्यायचे आणि त्याचे बट्स खिडकीच्या बाहेर फेकायचे. हे बट्स उचलून मी जमीनीवर झोपून प्यायचो. एकदा वडिलांना खिडकीच्या बाहेर धुर दिसला. त्यांनी डोकून बघितले तेव्हा त्यांना मी सिगारेट पिताना दिसलो. यानंतर मला सुधारण्यासाठी त्यांनी मला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. परंतू तरीही संजयच्या वागण्यात बलद झाला नाही. यासिर उस्मान यांच्या 'द क्रोजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड ब्वॉय संजय दत्त' या पुस्तकात उल्लेख आहे की, संजयने बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतानाच दारु आणि सिगारेट पिणे सुरु केले. तो कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली. नंतर ड्रग्सची सवय सोडण्यासाठी संजय दत्तला विदेशात जाऊन उपचार घ्यावे लागले. 

बातम्या आणखी आहेत...