आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

56 व्या वर्षी सुनील शेट्टी मेंटेन करतात 6 पॅक एब्स, वर्कआउट करतानाचा फोटो केला शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्कः 56 वर्षीय अभिनेते सुनील शेट्टी आपल्या फिटनेसविषयी अतिशय जागरुक आहेत. वयाची पंच्चावन्न वर्षे उलटून गेल्यानंतरही त्यांची बॉडी बघण्यासारखी आहे. त्यांनी अलीकडेच इंस्टाग्राम अकाउंटवर सिक्स पॅक अॅब्स बनवतानाचा फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करताच सोशल मीडियावर फॅन्स म्हणाले, 'What a body Aanna'.


स्वतःला फिट ठेवण्यासाठी हार्ड रुटीन फॉलो करतात सुनील... 
- एका मुलाखतीत सुनील यांनी सांगितले होते की, की स्वतःला फिट ठेवण्यासाठी ते हार्ड रुटीन फॉलो करतात. 
- ते जंक फूट आणि तळलेले पदार्थ खात नाहीत. घरच्या जेवणालाच त्यांचे प्राधान्य असते. याशिवाय कार्बोहाइड्रेट आणि प्रोटीनयुक्त डाएट ते घेतात.

 

असे असते एक्सरसाइज रुटीन...
- एका फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी यांनी सांगितले होते, की ते दररोज सकाळी पाच वाजता उठतात आणि दोन तास वेगवेगळ्या एक्सरसाइज करतात.  
- त्यांनी सांगितले होते, "मी पहिला तास योग आणि प्राणायाम करतो आणि नंतरची 45 मिनिटे जिममध्ये वर्कआउट करतो."
- सुनील यांनी पुढे सांगितले, 'जेव्हा मी तरुण होतो, तेव्हा हेवी लिफ्टिंग, वेट आणि कठिण वर्कआउट  करायचो. आताही तेवढेच कठीण व्यायाम करतो. मी प्लान करुन एक्सरसाइज करतो. सुरुवातीला मी हेवी वेटसोबत 10 Reps लावले तर 20 Reps हलक्या वजनासोबत लावतो. मसल्स ग्रुपसाठी माझे फोकस वेगवेगळ्या एक्सरसाइजच्या तीन किंवा चार सेट लावण्यावर असते.'

 

1992 मध्ये केले होते डेब्यू...

सुनील शेट्टी यांनी 1992 मध्ये आलेल्या 'बलवान'द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.  'वक्त हमारा है' (1993), 'दिलवाले' (1994), 'मोहरा' (1994), 'एक था राजा' (1996), 'बॉर्डर' (1997), 'आक्रोश' (1998), 'बड़े दिलवाला' (1999), 'धडकन' (2000), 'आवारा पागल दीवाना' (2002), 'मै हूं ना' (2004), 'जय हो' (2014) हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. सध्या त्यांच्या हाती नवीन प्रोजेक्ट नसून ते त्यांच्या हॉटेल बिझनेसमध्ये बिझी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...