आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Karenjit Kaur The Untold Story: रिलीजपुर्वीच वादात अडकला सनी लियोनीचा बायोपिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: सनी लियोनीचा बायोपिक 'करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' रिलीज पुर्वीच वादाच्या भोव-यात अडकला आहे. शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधक कमिटी (एसजीपीसी)ने चित्रपटाच्या नावाविषयी आक्षेप घेतला आहे. कमेटीचे प्रवक्ता दिलजीत सिंह बेदी यांनी सांगितले की, सनी लियोनीने 'कौर' शब्दाचा वापर करु नये. ते म्हणतात की, असे करणे शिख भावनांना ठेस पोहोचवते. 


- सनीचे खरे नाव करनजीत कौर होते. यानंतर तिने तिचे नाव बदलून सनी लियोनी ठेवले. आता शिरोमणी गुरुव्दारा प्रबंधक कमेटीनुसार ते याविषयी सरकारकडे तक्रार करणार आहेत. कमेटीने घेतलेल्या आक्षेपावर अजून मेकर्स किंवा सनी लियोनीकडून प्रतिक्रिया आलेली नाही. 
- डायरेक्टर आदित्य दत्तच्या 'करनजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी'मध्ये स्वतः सनी प्रमुख भूमिका साकारतेय. एखाद्या अभिनेत्रीने स्वतःच्या बायोपिकमध्ये लीड रोल प्ले करण्याची ही पहिली वेळ आहे. ही एक वेब फिल्म आहे. 16 जुलैला जी5वर हा चित्रपट रिलीज होणार आहे.
- सनी 2011 मध्ये 'बिग बॉस' सीजन 5 मध्ये दिसली होती. यानंतर सनी खुप चर्चेत राहिली. 'बिग बॉस'च्या घरातच महेश भट्ट यांनी सनीला 'जिस्म-2' चित्रपटासाठी साइन केले होते. सनीने 'रागनी एमएमएस-2', 'एक पहेली लीला', 'कुछ कुछ लोचा है', 'वन नाइट स्टैंड'  सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...