आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sunny लिओनीच्या बायोपिकचा Trailer रिलीज, पोर्न इंडस्ट्रीत का आली करनजीत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करणजीत कौर उर्फ सनी लिओनीचा एका पॉर्न स्टारपासून ते अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. तिच्या आयुष्याचा न माहीत असणारा भाग तिच्या चाहत्यांसाठी आणि प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. आता सनी लिओनीच्या ‘करणजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओन’ या वेब सिरीजद्वारे आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा प्रेक्षकांसमोर आणणार आहे. या वेबसिरीजचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला असून सनीच्या संपूर्ण आयुष्यावरील ही वेबसिरीज आहे. 'आज हम जिस शख्सियत का इंटरव्यू करने जा रहे हैं, उसे हिन्दुस्तान में प्यार और नफरत बराबर-बराबर मिली है। लेकिन बहुत सारे लोगों के लिए ये वो हैं जो एक भारतीय नारी को नहीं होना चाहिए… सनी लियोनी'। या शब्दांत सनीच्या 'करनजीत कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन'च्या ट्रेलरची सुरुवात होते. 


2 मिनिटे 24 सेकंदांच्या ट्रेलरची सुरुवात सनी ग्रीन रुममध्ये एका मुलाखतीसाठी तयार होत आहे अशी दाखवण्यात आली आहे. सनीचा जन्म कॅनडामध्ये झाला. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा आहे. सनीच्या घरातील आर्थिक परिस्थितीमुळं पॉर्न इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी कसं तिला पाऊल उचलावं लागलं हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.  


या ट्रेलरमध्ये सनीचा भाऊ संदीपबरोबर तिचे नाते अतिशय चांगले दाखवण्यात आलं आहे. वास्तविक सनीच्या भावाने तिला या सगळ्या परिस्थितीत समजून घेतले होते.  येत्या 16 जुलैपासून ZEE5 वर ही वेब सीरिज सुरु होणार आहे. सनी 2011  मध्ये 'बिग बॉस' सीजन 5 मध्ये झळकली होती. बिग बॉसच्या घरातच महेश भट यांनी तिला 'जिस्म-2' या चित्रपटासाठी साइन केले होते. सनीने आतापर्यंत 'रागनी एमएमएस-2', 'एक पहेली लीला', 'कुछ कुछ लोचा है', 'वन नाइट स्टँड' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.  

बातम्या आणखी आहेत...