आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: मुलगी दत्तक घेऊन झाले एक वर्ष, सनीने पुन्हा शेअर केला तो वादग्रस्त फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सनीचा बायोपिक वेब सीरीज 'करनजीत कौर, द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी'16 जुलैला रिलीज झाला. याच दिवशी सनी लियोनी आणि डेनियल वेबरने मुलगी निशा कौरला दत्तक घेऊन एक वर्ष झाले. या निमित्ताने सनीने एक फोटो शेअर केला. यामध्ये डेनियल आणि निशा दिसत आहे. सनीने फादर्स डेला 17 जून रोजीसुध्दा हाच फोटो शेअर केला आहे. तेव्हा या फोटोवर मोठा वाद झाला होता. सनीने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, "एकावर्षापुर्वी आम्ही तुला जेव्हा घरात घेऊन आलो. हाच तो दिवस होता जेव्हा आमचे आयुष्य बदलले. आज तुझी Gotcha अॅनिवर्सरी आहे. मला विश्वास बसत नाहीये की, फक्त एक वर्ष झाले आहे. कारण मला असे वाटते की, मी तुला आयुष्यभरापासून ओळखते. तु माझे हृदय आणि आत्म्याचा तुकडा आहेस आणि जगातील सर्वात सुंदर मुलगी आहे. मी तुझ्यावर खुप प्रेम करते निशा कौर वेबर"

 

फोटोमुळे ट्रोल होतेय सनी
- सनीने जो फोटो शेअर केला आहे. यामध्ये डेनियल विना शर्ट आणि सनी विना टॉपची दिसतेय. यासोबतच त्यांनी मुलीलाही काही घातलेले नाही. हे पाहून काही सोशल मीडिया यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत. "कमीत कमी मुलीला तरी कपडे घालायचे होते, लाज वाटते दोघांची." तर एका यूजरने लिहिले की, "फोटोमध्ये सेक्शुअल काही नाही. पण तुम्ही कपडे घालून फोटो शेअर करु शकत नव्हते का? तिला (सनी) माहिती आहे की, तिच्या अशा फोटोवर लोक अनेक वादग्रस्त कमेंट करतात. मग ऑडियन्ससमोर असे फोटो आणण्याचा अर्थ काय? हा फोटो शेअर करण्याचा हेतू काय? मी विश्वासाने सांगतो की, तिच्याकडे कपडे घातलेले अनेक फोटोज असतील." तर एका दूस-या यूजरने लिहिले की, "ज्यावेळी मुलीला कळेल की, तिची आई पोर्न स्टार होती, तेव्हा तिला काय वाटेल." तर एका यूजरने लिहिले की, "सनीला विनंती आहे की, मुलीसोबत न्यूड फोटो शेअर करु नको."


दत्तक घेतले तेव्हा 21 महिन्यांची होती निशा
- 16 जुलै 2017 ला सनी आणि डिनियलने लातूर(महाराष्ट्र) च्या एका अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतले होते. त्यावेळी निशा 21 महिन्यांची होती. याच्या तीन महिन्यांनंतर अक्टोबरमध्ये निशाचा दूसरा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यासोतबच सनी आणि डेनियल यांना दोन मुलं आहेत. याच वर्षी मार्चमध्ये सनीने सांगितले की, सरेगेसीच्या माध्यमातून ती दोन मुलांची आई झाली आहे. सनीने ट्विटरवर ही गुड न्यूज दिली होती. 
- सनील लवकरच दाक्षिणात्या पीरियड ड्रामा चित्रपट 'वीरमादेवी' मध्ये दिसणार आहे.
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...