आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे शूटिंगमध्ये व्यस्त आहे सनी लियोनी, तर मुलांसोबत वेळ घालवतोय नवरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री सनी लियोनी सध्या रिअॅलिटी शो 'एमटीव्ही स्प्लिट्सविला 11' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचा नवरा डेनियल वेबर मुलांच्या देखदेखीमध्ये व्यस्त आहे. डेनियलने जुळ्या मुलांसोबत आपला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो जुळी मुलं अशार आणि नूहसोबत चिल करताना दिसतोय. त्या या फोटोला "Life !!! By @tomasmoucka !!!!" असे कॅप्शन दिले. तर सनी लियोनी सध्या स्वतःवर तयार होत असणारा बायोपिक 'करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी'ची शूटिंगही करत आहे. 


मुलीला घेतले दत्तक तर सरोगेसीच्या माध्यातून जुळी मुलं

- जुलै 2017 मध्ये सनी आणि डेनियलने महाराष्ट्राच्या लातूरमधून मुलगी निशा कौरला दत्तक घेतले होते. मुलीला दत्तक घेण्यासाठी तिने 2015 मध्येच अप्लाय केला होता.
- तर रिपोर्ट्सनुसार जुळी मुलं अशार आणि नूहचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून झाला. दोघांचा जन्म 5 मार्च, 2018 ला झाला होता.
- तीन मुलांचे पालक बनल्यानंतर सनीने स्वतः हा आनंद व्यक्त करत इंस्टाग्रामवर पोस्ट टाकली होती. यावर तिने लिहिले होते की, अनेक वर्षांनंतर अशार सिंह वेबर, नूह सिंह वेबर आणि निशा कौर वेबरसोबत आमचे कुटूंब कंप्लीट झाले आहे. आमच्या मुलांचा जन्म काही आठवड्यांपुर्वीच झाला आहे. परंतू ते गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मनात आणि डोळ्यांत जिवंत होते.

 

पोर्न स्टारनंतर बनली अभिनेत्री
पोर्न स्टारनंतर अभिनेत्री बनलेली सनी लियोनी बिग बॉसची कंसेस्टेंट राहिली आहे. तिने 2012 मध्ये 'जिस्म 2' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिने  'जैकपॉट', 'रागिनी एमएमएस 2', 'एक पहेली लीला', 'कुछ कुछ लोचा है', 'वन नाइट स्टेंड', 'बेइमान लव' सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनीने काही चित्रपटांमध्ये कॅमिओ तर काहीमध्ये आयटम नंबर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...