आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airport वर 3 महिन्यांच्या मुलासोबत दिसली सनी, कॅमे-यांकडे लक्ष न देता मुलाला पाजले दूध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः अभिनेत्री सनी लिओनी याकाळात  'वीर महादेवी' या तामिळ चित्रपटासोबतच 'स्प्लि्टसजविला' या शोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दरम्यान ती रविवारी मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिच्यासोबत तिचा तीन महिन्यांचा चिमुकला सोबत होता. खास गोष्ट म्हणजे कॅमे-यांकडे दुर्लक्ष करत सनी यावेळी मुलाची काळजी घेताना आणि त्याला दूध पाजताना दिसली. यावेळी तिच्यासोबत तिचा दुसरा मुलगा दिसला नाही. 


मुलीसोबत केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे सनी झाली होती ट्रोल... 
- 17 जून रोजी फादर्स डेच्या निमित्ताने  सनी आणि तिचा पती डेनियल यांनी मुलांसोबत एक फोटोशूट केले होते. त्याचे फोटोजही त्यांनी शेअर केले होते.
- डेनियलने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये तो पत्नी सनी आणि मुलगी निशासोबत सेमी न्यूड दिसला होता. हा फोटो समोर आल्यानंतर सनी आणि डेनियल ट्रोल झाले होते.


तीन मुलांची आई आहे सनी लिओनी... 
- सनी लियोनी तीन मुलांची आई झाली असून मुलांसोबतचे फोटोज कायम शेअर करत असते. 
- सनी आणि डेनियल  यांनी लातूर येथून 21 महिन्यांच्या निशाला दत्तक घेतले होते. त्यानंतर याचवर्षी मार्च महिन्यात हे दोघे नोहा आणि अशर या जुळ्या मुलांचे आईबाबा झाले.