आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Superstar राजेंद्र कुमार यांना आर्थिक अडचणींमुळे विकावे लागल होते घर, दुःखात रात्रभर रडले होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: जुबली हिरोच्या नावाने प्रसिध्द असलेल्या राजेंद्र कुमारची आज 19 वी डेथ अॅनिव्हर्सरी (12 जुलै, 1999) आहे. सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या राजेंद्र कुमारविषयी एक गोष्ट प्रसिध्द होती. ते स्वतःवर किंवा मित्रांवर पैसे खर्च करत नव्हते. यामुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये लोक कंजूस म्हणायचे. ज्यावेळी त्यांच्यावर आर्थिक संकट आले तेव्हा त्यांनी आपला लकी असलेला बंगला राजेश खन्नाला विकला होता. हा बंगला सोडून जेव्हा त्यांना जावे लागले तेव्हा ते पुर्ण रात्र रडत होते.

 

50 रुपये घेऊन मुंबईत हिरो बनण्यासाठी पोहोचले होते
- राजेंद्र कुमार यांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी खुप संघर्ष करावा लागला होता. ते हिरो बनण्यासाठी ज्यावेळी मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्या खिशात फक्त 50 रुपये होते. हे पैसे त्यांना वडिलांनी दिलेली घड्याळ विकून मिळाले होते. गीतकार राजेंद्र कृष्णाच्या मदतीने त्यांना 150 रुपये पगारावर डायरेक्टर एचएस रवैल यांचा सहाय्यक म्हणून काम मिळाले होते.
- 1950 मध्ये आलेल्या 'जोगन' मध्ये राजेंद्र कुमार यांना काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिलीप कुमार प्रमुख भूमिकेत होते. 1950 ते 1957 पर्यंत राजेंद्र कुमार यांनी चित्रपट इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष केला. 1957 मध्ये आलेल्या 'मदर इंडिया' चित्रपटात त्यांनी छोटी भूमिका केली, तरीही त्यांना पसंती मिळाली. 
- 1959 मध्ये आलेला 'गूंज उठी शहनाई' मधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. हा त्यांचा पहिला हिट चित्रपट होता. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 'धूल का फूल' (1959), 'मेरे महबूब' (1963), 'आई मिलन की बेला' (1964), 'संगम' (1964), 'आरजू' (1965), 'सूरज' (1966)  इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांमधील मिळाले यश पाहता त्यांच्या चाहत्यांनी त्याचे नाव 'जुबली कुमार' असे ठेवले. 1970 नंतर राजेंद्र कुमार यांचे स्टारडम कमी झाले होते. 


आर्थिक परिस्थिती बिकट
70 च्या दशकात जुबली हिरोचा इफेक्ट कमी झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राजेंद्र कुमार यांना आपला 'डिंपल' हा बंगला विकावा लागला. राजेंद्र कुमार यांनी 1960 मध्ये हा बंगला विकत घेतला होता. बांद्रा येथील कार्टर रोडवर समुद्र किनारी हा बंगला होता. अभिनेता भारत भूषण कडून 60 हजारात त्यांनी हा बंगला खरेदी केली होता. त्यांनी या बंगल्याला नवीन रुप देऊन आपल्या मुलीचे नाव 'डिंपल' या बंगल्याला दिले. या बंगल्यात येताच राजेंद्र कुमार यांना यश मिळणे सुरु झाले. यामुळे ते या बंगल्याला लकी मानत होते. ज्यावेळी राजेश खन्नाला कळाले की, राजेंद्र हा बंगला विकत आहेत, तेव्हा त्यांनी हा बंगला तात्काळ खरेदी केला. राजेश खन्ना यांनी हा बंगला 3.5 लाखांत खरेदी केला. नंतर राजेश खन्ना यांनी या बंगल्याचे नाव 'आशीर्वाद' असे ठेवले.

 

को-स्टारसोबत होते अफेअर
राजेंद्र कुमार यांनी सर्वात जास्त हिट चित्रपट सायरा बानो यांच्यासोबत केले.  'आई मिलन की बेला' (1964), 'झुक गया आसमान' (1968), 'अमन' (1967) असे हे चित्रपट होते. एकत्र स्क्रिन शेअर करताना ते दोघं प्रेमात पडले होते, असे बोलले जाते.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...