आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनी B'Day: 9 व्या वर्षी हरपले मातृछत्र, ओझी वाहाण्याचेही काम केले या सुपरस्टारने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लिजेंडरी अभिनेते रजनीकांत  यांचा आज (12 डिसेंबर 1950) वाढदिवस  आहे. दक्षिणेत लोक त्यांची देवाप्रमाणे  पूजा करतात. त्यांच्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. आज संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या नावाचा गाजावाजा आहे. मात्र, गरिबीचे अनेक चटके सहन करत रजनीकांत यांनी हे स्थान मिळवले आहे. वयाच्या 9व्या वर्षी आईचे छत्र हरपले आणि दुर्दैवाचा फेरा सुरु झाला होता. 

 

सर्वच जाणतात की अभिनेते होण्यापूर्वी रजनीकांत एक बस कंडक्टर होते. परंतू सिनेमांत त्यांची एंट्री कशी झाली हे फार कमी लोकांना माहित आहे. रजनीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com सांगत आहे त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी. 

 

1. मोठ्या सिनेमात मिळाला छोटा ब्रेक
रजनीकांत यांना सर्वात पहिला ब्रेक 1975मध्ये वयाच्या 25व्या वर्षी मिळाला. हा सिनेमा होता 'Apoorva Raagangal'. कमल हसान स्टारर, दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या या सिनेमात रजनीकांत यांना केवळ 15 मिनीटांची भूमिका मिळाली होती. ही भूमिका कुणाच्या नजरेससुध्दा पडली नव्हती. त्यावेळी कुणी विचारदेखील केला नसेल, की हा साधा-सरळ दिसणारा माणूस एकदिवस सुपरस्टार होईल.

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, जेव्हा चाहत्यांनी जाळल्या रजनी यांच्या फिल्मच्या रिळ... 

बातम्या आणखी आहेत...