आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपुतने शेअर केला Unbutton जीन्सचा बोल्ड फोटो, लोकांनी म्हटले किती निर्लज्ज आहेस !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपुतने इन्सटाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने त्याची जीन्स गुडघ्यापर्यंत खाली केली आहे आणि त्यावर त्याने एक कॅप्शन लिहीले आहे, '🎶 My Girl My Girl Don’t lie to me... 🎶'. सुशांतने एका फॅशन मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे आणि हा फोटो त्याच शूटमधील आहे. सुशांतची ब्लु जीन्स त्याच्या गुडघ्यापर्यंत आली आहे आणि त्यामुळे त्याची अंडरविअर दिसत आहे. हा फोटो खूप व्हायरल झाला आहे आणि त्यावर लोकांच्या विचित्र कमेंटसही येत आहेत. लोकांनी म्हटले किती निर्लज्ज आहेस, असे दिले कमेंट्स..

 

सुशांत सिंह राजपुतचा हा फोटो पाहून यूजरने लिहीले, हे काय फोटोशूट आहे तर दुसऱ्या यूजरने लिहीले, सुशांत तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. एकाने म्हटले अरेरे, हे काय आहे..


सुशांतचा हा आहे आगामी चित्रपट...
सुशांतने नुकतेच 'ड्राइव' चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. आता त्याने चित्रपट 'सोन चिरैया'ची शूटिंग सुरु केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भूमि पेडनेकर, मनोज वाजपेयी, आशुतोष राणा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे करत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सुशांतच्या फोटोवर लोकांनी केलेले कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...