आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास तयार आहे सुष्मिता, पण ठेवली अशी अट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिस यूनिवर्स राहिलेली अभिनेत्री सुष्मिता सेन म्हणते की, मी गेल्या दिड वर्षांपासून चांगल्या पटकथेच्या शोधात आहे. सुश्मिता शेवटी 2010 मध्ये 'नो प्रॉब्लम' या चित्रपटात दिसली होती. नुकतीच ती, आपली लहान मुलगी अलीशासोबत मुलांच्या रुबल नागी कला फाउंडेशनच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होती. यावेळी तिला तिच्या पदार्पणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. तर ती म्हणाली की मी गेल्या दिड वर्षांपासून पटकथा पाहत आहे. पदार्पणाविषयी बोलली असे...

 

- सुष्मिता म्हणाली की, "मला वाटते की, मी माझ्या आयुष्यातील 6 महिने एका चित्रपटाला देण्यास तयार आहे. परंतू मी तयार आहे याचा अर्थ असा नाही की, माझ्यासाठी एक चांगली पटकथाही तयार आहे."
- "माझी सर्वात मोठी इच्छा स्टार बनणे ही नव्हती, तर मला लोकांशी कनेक्ट व्हायचे होते."

- सुष्मिता अजून म्हणाली की, " मी म्हणाले की, मी लोकांशी कनेक्ट होण्याचा मार्ग शोधते. फिल्म स्टार बनायचे नव्हते तर मला लोकांच्या मनाशी जुळायचे होते. मी देवाचे आभार मानते की, त्यांनी मला अभिनेत्री बनायची संधी दिली."
- सुष्मिताने मधल्या काळात बंगाली फिल्म केली होती. परंतू बॉलिवूडलाही सुष्मिताची प्रतिक्षा आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुष्मिताचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...