आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमरस लूकसाठी स्वराने घाला शॉर्ट Dress, लोक म्हणाले निरमावाली दीदी सापडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपट 1 जूनला रिलीज होतोय. रिलीजपुर्वी स्वरा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 22 मे रोजी चित्रपटाचे म्यूझिक लॉन्च इव्हेंटमध्ये स्वराने पांढरा फ्रॉक घातला होता. स्वरा या शॉर्ट ड्रेसमध्ये खुप सुंदर दिसत होती. परंतू तरीही सोशल मीडियावर लोकांनी   तिची खिल्ली उडवली. पिहू नावाच्या यूजरने तर लिहिले की, निरमावाली दीदी मिळाली.


- एका यूजरने लिहिले - स्वरा या ड्रेसमध्ये निरमाच्या जाहिरातीमधील मुलगी दिसतेय. तर एका यूजरने लिहिले की, - दूध सी सफेदी निरमा से आए, रंगीन कपडा भी खिल-खिल जाए. 90 च्या दशकात दूरदर्शनवर निरमाची जाहिरात यायची, यामध्ये पांढ-या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी दिसायची. लोकांनी स्वरा आणि तिची तुलना या मुलीच्या ड्रेससोबत करणे सुरु केली. 
स्वराने दिली अशी रिअॅक्शन
आपल्या ड्रेसची तुलना निरमा गर्लसोबत केल्यानंतर यावर स्वरानेही रिअॅक्शन दिली. तिने हसत लिहिले - Hahahahhaahhahahaha! Actually ! :) killer..


4 मैत्रिणींच्या अवतीभोवती फिरते कथा
'वीरे दी वेडिंग' चित्रपटाची कथा चार फ्रेंड्सच्या अवतीभोवती फिरते. त्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणाने बोलताना दिसतात. डायरेक्टर शशांक घोषच्या या चित्रपटात करीनासोबतच सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट सोनम कपूरची बहिण रियासोबतच एकता कपूर, शोभा कपूर आणि निखिल अडवाणीने प्रोड्यूस केला आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक वाचा, स्वराच्या ड्रेसविषयी लोकांनी कशी उडवली खिल्ली...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...