आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tarak Mehta Ka Ooltah Chashma Actor Hansraj Hathi Kavi Kumar Azad Suffered Heart Attack And Died

Bad News: \'तारक मेहता का उल्टा चश्मा\'च्या या सुप्रसिद्ध कलाकाराचे हृदयविकाराने निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क:  'तारक मेहता का उल्टा चश्मा...' या प्रसिद्ध मालिकेतील एका कलाकाराचे आकस्मित निधन झाले आहे. मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे कलाकार कवी कुमार आझाद यांचा हृदयविकाराच्या झटक्याने सोमवारी निधन झाले. "तारक मेहता का उल्टा चश्मा..." या मालिकेतून कवी कुमार हे घराघरात पोहोचले होते.

 

कवीकुमार हे दीर्घकाळपासून या मालिकेत काम करत होते. काही दिवसांपूर्वींच कवीकुमार यांनी ट्विटर अकाउंटवर आपला एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला त्यांनी मनाला स्पर्श करणारे कॅप्शन दिले होते. असे होते कॅप्शन, "किसी ने कहा है कल हो न हो, मैं कहता हूं पल हो न हो. हर लम्हा जियो." या कलाकाराच्या मृत्यूने इंडस्ट्रीला मोठा झटका लागला आहे.

 

मीडिया रिपोर्टनुसार, कवीकुमार यांनी 2010 मध्ये आपले 80 किलो वजन सर्जरीने कमी केले होते. या सर्जरीनंतर त्यांचे रोजचे आयुष्य सुखकर झाले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, "लोकांना माझी भूमिका आवडली याचा मला आनंद आहे." 

बातम्या आणखी आहेत...