आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

The accidental prime minister: राहुल-प्रियांकानंतर भेटा चित्रपटातील लालू प्रसाद आणि एल.के. अडवाणी यांना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून ते भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांचा लूक काही दिवसांपुर्वीच समोर आला. यानंतर स्वतः अनुपम खेर यांनी चित्रपटातील राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची भूमिका कोण साकारणार हे सांगितले होते. आता त्यांनी ट्वीट करुन चित्रपटातील लालू प्रसाद यादव, एल.के. अडवाणी आणि शिवाजी पाटील यांचा लूक रिव्हिल केला आहे. 

 

अनुपम खेर यांनी केले ट्वीट
अनुपम खेर यांनी ट्वीट करत एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत त्यांनी  “Introducing Avtar Sahni as #LKAdvaniJi, Vimal Verma as #LaluPrasadYadavJi and Anil Rastogi as #ShivRajPatilJi.:) #TheAccidentalPrimeMinister @tapmofficial @sunil_s_bohra #VijayGutte.”  असे कॅप्शन दिलेय. 
- अवतार साहनी हे एल.के. अडवाणी यांची भूमिका साकारत आहेत. लालू प्रसाद यादव यांची भूमिका विमल वर्मा साकारणार आहेत आणि अनिल रस्तोगी शिवराज पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

 

यापुर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधीचा लूक केला होता रिव्हिल
अर्जुन माथूर आणि आहाना कुम्रा हे या चित्रपटात अनुक्रमे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली होती. प्रियांका गांधींच्या भूमिकेत दिसणारी आहाना कुम्रा अनेकांचच लक्ष वेधत आहे. यापूर्वी अनुपम खेर यांनी ट्वीट करुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नीची भूमिका वठवणा-या अभिनेत्रीचे नाव जाहिर केले होते. त्यांनी ट्वीट केले होते, “देशाचे माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौरच्या रुपात दिव्यी सेठ शाह आपल्या भेटीला येत आहेत.”

 

संजय बारूंच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट...
काही काळासाठी मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. 2014 साली झालेल्या निवडणूकीपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकाचे बारू यांनी अनावरण केलं होतं. यावर्षी 21 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

बातम्या आणखी आहेत...