Home | News | The Baaghi 2 Co Stars Spending Time On The White Beaches Of Sri Lanka

गर्लफ्रेंड दिशासोबत श्रीलंकेत एन्जॉय करतोय टायगर, बीचवर दिसली बिकिनीत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 02, 2018, 04:54 PM IST

अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ सध्या श्रीलंकेत आहेत.

 • The Baaghi 2 Co Stars Spending Time On The White Beaches Of Sri Lanka

  मुंबईः अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ सध्या श्रीलंकेत आहेत. लवकरच हे दोघे 'बागी 2' या चित्रपटात झळकणार आहेत. आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत या दोघांनी येथे नवीन वर्ष साजरे केले. या दोघांनी व्हेकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटोज शेअर केले आहेत.

  सोशल मीडियावर पोस्ट केले फोटोज...

  - दिशा आणि टायगर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी एकत्र सुटी एन्जॉय करतानाचे फोटोज इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. दिशा ब्लॅक बिकिनीत नेहमीप्रमाणे हॉट दिसतेय. तर दुसरीकडे टायगर शॉर्ट्समध्ये असून आपली मस्क्युलर बॉडी फ्लॉन्ट करतोय.

  - हे दोघेही सध्या 'बागी 2' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. 2016 मध्ये आलेल्या 'बागी' या चित्रपटाचा हा सिक्वेल असून अहमद खान हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. तर साजिद नाडियाडवाला चित्रपटाचे निर्माते आहेत. 'बागी'मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर लीड रोलमध्ये होती.

  - अलीकडेच टायगर आणि दिशा यांचे श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वीचे एअरपोर्टवरील काही फोटोज समोर आले होते. या फोटोमध्ये टायगर चक्क दिशाच्या मांडीवर बसलेला दिसला होता. येथे दोघांची भेट रणवीस सिंगसोबत झाली होती. टायगरने रणवीरला त्याची सीट ऑफर केली आणि तो स्वतः दिशाच्या मांडीवर जाऊन बसला.
  - टायगर आणि दिशा अनेक ठिकाणी एकत्र फिरताना दिसत असतात. पण अद्याप त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपची सार्वजनिकरित्या कबुली दिलेली नाही.


  पुढील स्लाईड्सवर बघा, टायगर आणि दिशाचे फोटोज...

 • The Baaghi 2 Co Stars Spending Time On The White Beaches Of Sri Lanka
 • The Baaghi 2 Co Stars Spending Time On The White Beaches Of Sri Lanka
 • The Baaghi 2 Co Stars Spending Time On The White Beaches Of Sri Lanka
 • The Baaghi 2 Co Stars Spending Time On The White Beaches Of Sri Lanka

Trending