आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणा मॉडेलहून कमी नाही अनु्ष्का शर्माचा 'कुडावाला' तरुण, शाहरुखसह मोठ्या स्टार्ससोबत केले काम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली चर्चेमध्ये आहेत. त्याला कारण आहे की विराटने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता त्यात अनुष्का शर्मा एका कारमध्ये बसलेल्या तरुणाला रस्त्यावर कचरा फेकल्यामुळे रागवताना दिसत होती. अनुष्काचा हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काने ज्या व्यक्तीला कचरा फेकल्याबद्दल रागावले होते त्याचे नाव अरमान सिंह आहे. या घटनेनंतर अरहान सिंहने फेसबुक पेजवर अनुष्का-विराटवर चांगलेच ताशेरे ओढले. स्वच्छ अभियानचे धडे देणारी अनुष्काला या कारणामुळे ट्रोलही व्हावे लागले आहे. 

आता याच अरमान सिंहबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.अरहान सिंहचेही बॉलिवूडशी चांगलेच कनेक्शन आहे. मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार, अरहान एक चाईल्ड आर्टीस्ट होता. त्याने अनेक चित्रपटांत बालकलाकाराची भूमिका वठवली आहे. 

 

इतकेच नाही तर अरहान सिंहने शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांसारख्या सेलिब्रेटींसोबतही काम केले आहे. माधुरीने 1996 साली आलेला शाहरुखचा चित्रपट 'इंग्लिश बाबू देसी मैम' आणि माधुरी दीक्षितचा 'राजा' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. अरहानने पॉप्युलर टीव्ही शो 'देख भाई देख'मध्येही काम केले आहे तर शाहिद कपूरच्या 'पाठशाला' चित्रपटातही काम केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अरहानच्या इन्सटाग्राम पेजवरुन घेण्यात आलेले काही Photos..

बातम्या आणखी आहेत...