आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिममध्ये न जाता 61 वर्षांच्या डायरेक्टरने कमी केले 25Kg वजन, घेत आहे हे औषध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : डायरेक्टर आणि अॅक्टर सतीश कौशिकचे काही फोटोज समोर आलेय. यावरुन चर्चा आहे की, त्यांनी 25 किलो वजन घटवले आहे. एका वेबसाइटसोबत बोलताना सतीश (61) यांनी स्वतः सांगितले की, त्यांनी जिममध्ये न जाता वजन कमी केले. 


एका औषधाने केली किमया
- सतीश यांनी टाइम्स नाउ हिंदीसोबत बोलताना सांगितले की, वजन कमी करण्यासाठी ते अमेरिकेचे डॉक्टर क्रिश्यिन मिडिल्टनला भेटले. मिडिल्टनने त्यांना Chirothin मेडिसिन घेण्याचा सल्ला दिला.
- सतीश सांगतात की, रोज सात तासांच्या अंदराने त्यांनी औषधांचे 7 ड्रॉप घेतले.
- हे औषध त्यांनी जवळपास 40-42 दिवस घेतले. यानंतर चार-पाच आठवडे आवडते जेवण केले त्यानंतर 40-42 दिवस औषधे घेतली. सतीश यांनी असे तीन प्रोग्राम केले आहेत. आता चौथा प्रोग्राम करत आहेत.


वजन कमी करण्यात डायटची प्रमुख भूमिका
- सतीश सांगतात की, त्यांचे वजन कमी करण्यात डायट प्लानची प्रमुख भूमिका आहे. सतीश सांगतात की, सकाळी ते विना साखरेची चहा पितात. यानंतर 100 ते 120 ग्राम प्रोटीन म्हणजेच चीज, चिकन हे दिवसभरात खातात. जवळपास 100 ग्राम भाज्यांचे प्रमाण त्यांच्या शरीरात जात होत्या.

- ब्रोकली आणि सफरचंद हे जास्त प्रमाणात खात होते.
- सतीश सांगतात की, लंच आणि डिनरमध्ये कमीत कमी 14 ते 16 तासांचे अंतर असावे. यामधल्या काळात भूक मिटवण्यासाठी ते कच्च्या भाज्या घेत होते.
- सतीश सांगतात की, ते जिममध्ये गेले नाही. परंतू जेवणानंतर रोज एक दिड तास वॉकिंग केली.
- सतीशला 30-35 किलो वजन कमी करायचे होते.
- सतीश लवकरच  'वीरे दी वेडिंग', 'सूरमा', 'नमस्ते इंग्लैंड', 'यमला पगला दीवाना 3' सारख्या चित्रपटात दिसतील.
- 'तेरे नाम' च्या सीक्वलवरही ते काम करु शकतात अशा चर्चा आहेत. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहू शकता सतीश कौशिकचे काही लेटेस्ट फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...