आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पॅडमॅन' ला घाबरला पाकिस्तान, इस्लामशी जोडला संबंध आणि घातली बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान सेन्सॉर बोर्डाने अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट रिलीज न करण्याचा निर्णय घेतलाय. बोर्डचे म्हणणे आहे की, हा चित्रपट सभ्यता आणि संस्कृतिविरुध्द आहे. बोर्डच्या या निर्णयावर पत्रकार मेहर तरार संतापली. मेहरने ट्वीट करुन पीएफएसबीला उत्तर देत लिहिले की, पाकिस्तानमध्ये 'पॅडमॅन' बॅन करणे पाकिस्तानी सिनेमा बिझनेला नुकसान पोहोचवते. पीरिड्यस जीवनातील एक फॅक्ट आहे आणि या चित्रपटामुळे लोकांमध्ये जनजागृती घडवता येऊ शकते. हे काम अनैतिक किंवा गैर इस्लामिक नाही.  (Banning PadMan in Pakistan is another one of those illogical things that simply affect the business of cinemas in Pakistan. Menstruation is a fact of life, and bringing it to mainstream consciousness is neither immoral nor un-Islamic.) चित्रपट डिस्ट्रीब्यूटर्सला दिला नकार...


एफसीबीचे सदस्य इशाक अहमद म्हणाले की, आम्ही फिल्म डिस्ट्रीब्यूटर्स हा चित्रपट रिलीज करण्याची परवाणगी देऊ शकत नाही. कारण या चित्रपटाचाविषयी आमच्या परंपरांविरुध्द आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आयएमजीसीचे अमजद राशिद फिल्म घेऊन आले होते.

परंतू ट्रेलर पाहून त्यांनी नकार दिला. 


ट्रेड अॅनालिस्टनुसार दूस-या दिवशी 'पॅडमॅन'ने 14 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे चित्रपट दोन दिवसातच 26 कोटींची कमाई केली आहे. रविवारी यापेक्षा जास्त कमाई होण्याची शक्यता आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'पॅडमॅन' चित्रपटाचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...