आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Suicide: कुणी गळा चिरुन तर कुणी गळफास घेऊन... या 11 अभिनेत्रींनी केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः साउथची प्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस प्रियांकाने आत्महत्या केली आहे. प्रियंकाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत चेन्नईच्या वालासरावक्कम येथील तिच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला. सोबतच सुसाइड लेटरही आढळले आहे. प्रियंकाच्या मृत्यूची माहिती सर्वात प्रथम तिच्या मोलकरणीने दिली. आत्महत्येच्या मुख्य कारणांचा शोध घेण्यासाठी तपासकार्य सुरू करण्यात आले आहे. तथापि, प्राथमिकदृष्ट्या घरगुती वादामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. असे म्हटले जाते की, अॅक्ट्रेसचे लग्नाला 3 वर्षे उलटून गेली होती, परंतु तिला अपत्य नव्हते. यामुळे अभिनेत्री तणावात होती. याप्रकरणी पोलिसांनी 3 वर्षांपूर्वी प्रियंकाचे लग्न अरुणबालाशी झाले होते. परंतु, मतभेदांमुळे दोघेही दोन महिन्यांपासून वेगळे राहू लागले होते.

 

एकमेव प्रियांकाच नव्हे तर बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील आणखी काही अभिनेत्रींनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलेले होते. जाणून घेऊयात या अभिनेत्रींविषयी.. 

 

सय्याम खन्ना (मोना खन्ना)

बॉलिवूडमध्ये स्थापित होण्यासाठी संघर्ष करणा-या अभिनेत्री सय्याम खन्ना अर्थातच मोना खन्नाने 2014 साली आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली होती. मुंबईतील यारी रोड परिसरात राहत्या फ्लॅटमध्ये तिने पंख्याला गळफास घेतला होता. 28 वर्षीय सय्यामने केवळ दोनच सिनेमांत काम केले होते. 'द हॉन्टेड हाउस' आणि 'द लास्ट हॉरर' हे तिचे सिनेमे होते. फिल्म इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याने नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे म्हटले गेले होते.

 

पुढील स्लाईड्सवर वाचा, आत्महत्या केलेल्या 9 अभिनेत्रींविषयी...

बातम्या आणखी आहेत...