आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

18 वर्षानंतरही अंदाज कायम, हा आहे \'टोटल धमाल\'मधील अनिल-माधुरीचा फर्स्ट लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आगामी 'टोटल धमाल' या बॉलिवूड चित्रपटातील अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांचा हा लूक चित्रपटातील टायटल ट्रॅकचा आहे. या छायाचित्रात दोघांचा तोच रोमँटिक अंदाज बघायला मिळतोय, जो यापूर्वी म्हणजे तब्बल 18 वर्षांपूर्वी 'पुकार' (2000) मध्ये दिसला होता. 'पुकार'मध्ये माधुरी अखेरची अनिल कपूरच्या हीरोईनच्या रुपात मोठ्या पडद्यावर दिसली होती. त्यानंतर दोघांनी  'लज्जा'मध्ये काम केले होते. पण दोघांचे सीन एकत्र नव्हते. 

 

इंद्र कुमार दिग्दर्शित करत आहेत 'टोटल धमाल'...

- 'टोटल धमाल' हा चित्रपट इंद्र कुमार दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट  2007मध्ये आलेल्या 'धमाल' आणि  2011 मध्ये आलेल्या 'डबल धमाल'चा सिक्वेल आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये संजय दत्त, रितेश देशमुख, अर्शद वारसी, आशीष चौधरी आणि जावेद जाफरी मुख्य भूमिकेत झळकले होते. पण आता तिस-या भागात स्टारकास्ट नवीन आहे. यामध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अजय देवगण आणि सलमान खान मेन लीडमध्ये दिसणार आहेत. यावर्षी 7 डिसेंबर रोजी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

याचवर्षी जानेवारी महिन्यात अभिनेता आमिर खानने 'टोटल धमाल' या चित्रपटाचा फर्स्ट क्लॅप दिला होता. त्यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. पुढील स्लाईड्सवर बघा, ती खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...