आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्यांचा झाला गुलशन कुमार यांचा नातू, समोर आले PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रसिध्द सिंगर आणि टी-सीरीज कंपनीचे मालक स्वर्गीय गुलशन कुमार यांच्या मुलीने आपला मुलगा शिवायचे फोटोज शेअर केले आहे. तुलसीचा मुलगा 6 महिन्यांचा झाला आहे. तुलसीने 22 फेब्रुवारी, 2015 ला जयपुरचे बिझनेसमन हितेश रल्हानसोबत लग्न केले होते. तुलसी कुमार बॉलिवूडची प्रसिध्द प्लेबॅक सिंगर आहे. तिने 2006 मध्ये आलेल्या 'चुप चुपके'चे गाणे 'शब-ए-फिराक' मधून बॉलिवूड डेब्यू केला. 


डिसेंबर 2017 मध्ये झाला शिवायचा जन्म
- तुलसीचा मुलगा शिवायचा जन्म डिसेंबर 2017 मध्ये झाला होता.
- तुलसीचे पती हितेश जयपुरचे एक मोठे बिझनेसमन आहेत. त्यांचा येथे गारमेंट आणि फर्नीचर एक्सपोर्टचा बिझनेस आहे.
- हितेश आणि तुलसी यांची भेट कॉमन फ्रेंडच्या लग्नात झाली होती. यानंतर दोघांनी 2014 मध्ये कुटूंबाच्या सहमतीने साखरपुडा केला.
- वडील गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर तुलसीचा भाऊ कमारने T-Series कंपनी सांभाळली. तर तुलसीने सिंगिंगमध्ये करिअर केले.
- तुलसीने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्यूएशन केले.

 

'चुप-चुप के' चित्रपटातून सिंगिंग डेब्यू
तुलसीने 'चुप-चुप के' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये सिंगिंग डेब्यू केला. यानंतर 'हमको दीवाना कर गए' आणि 'अक्सर' चित्रपटात गाणे गायले. तिने म्यूझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया, प्रीतम आणि साजिद-वाजिदसोबत काम केले. तिने 'आशिकी 2', 'सिंघम रिटर्न', 'एयरलिफ्ट' आणि 'सनम रे', यारियां सारख्या चित्रपटांसाठी गाणे गायले आहेत.

बातम्या आणखी आहेत...