आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रतिज्ञा' फेम अमिता अद्गाता यांचे निधन, फुफ्फुसं निकामी झाल्याने मालवली प्राणज्योत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


टेलिव्हिजन विश्वात विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण फुफ्फुसं निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.  

 

अमिता यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना त्यांच्या को-स्टार अभा परमार म्हणाल्या, "त्यांच्या जाण्याने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून त्यांना भेटायची मला इच्छा होती. पण भेट होऊ शकली नाही. आम्ही दोघींनी एकत्र भरपूर काम केले होते. त्या मला बहिणीसारख्या होत्या."


- अमिता यांनी टीव्ही शोजसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले होते. त्यांनी परिणीती चोप्रासोबच 'हंसी तो फंसी' आणि ऐश्वर्या राय बच्चनसोबत 'सरबजीत' या चित्रपटांत अभिनय केला होता.
- ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत त्यांनी बुआची व्यक्तीरेखा साकारली होती 
- ‘प्रतिज्ञा’ या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेत त्यांनी रंगवलेली ‘दादी’ची भूमिका बरीच प्रकाशझोतात आली होती. 
- त्याशिवाय त्यांनी ‘डोली अरमानो की’, 'महाराणा प्रताप', 'बाबा ऐसो वर ढूंडो',  या मालिकांमध्येही काम केले होते. 
- 1965-1666 मध्ये त्यांनी रंगभूमीवर काम करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 1979 ते 1990 पर्यंत दिल्ली दुरदर्शनशीही त्या जोडल्या गेल्या होत्या.


पुढील स्लाईड्सवर बघा, अमिता अद्गाता यांचे 2 PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...