आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विंकलने शेअर केला पहिल्या पीरिडयचा किस्सा, बोलली - डाग पाहून पळाले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायरेक्टर आर बल्किची फिल्म 'पॅडमॅन' 9 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. ही फिल्म पीरिड्स आणि सेनेटरी पॅड्ससारख्याविषयी आहे. फिल्मची प्रोड्यूसर ट्विंकल खन्ना सध्या फिल्मचे प्रमोशन करतेय. काही दिवसांपुर्वीच ट्विंकलने पीरिड्सविषयी एक किस्सा सांगितला. तिने इव्हेंटमध्ये आपल्या पहिल्या पीरिड्सचा किस्सा सांगितला. ट्विंगलने सांगितले, 'मला आठवते की, मी बोर्डिंग स्कूलमध्ये होते आणि मला याविषयी काहीच माहिती नव्हती. तिथे मला पीरिड्सविषयी सांगायला आई किंवा मावशी कुणीही नव्हते. एक दिवस स्कूलच्या कँटिंगमध्ये मला वाटले की, माझ्या यूनिफॉर्मवर डाग लागलाय. मी ते पाहून लगेच पळाले आणि आपल्या रुममध्ये जाऊन कपडे चेंज केले. मी लकी होते की, हा डाग फक्त मीच पाहिला होता.' ट्विंकल म्हणाली की, पीरियड्सविषयी बोलताना लाज वाटून घेऊ नये. तिने अजून एक किस्सा सांगितला...


इव्हेंटच्या वेळी ट्विंकलने अजून एक किस्सा सांगितला. तिने सांगितले की, दक्षिण भारतात एका टीचरने एका 12 वर्षांच्या विद्यार्थिनीला क्लासमधून बाहेर काढले कारण, पीरियड्समुळे तिचा ड्रेस आणि सीटवर डाग पडले होते. त्या स्टूडेंटने बालकनीमधून उडी मारुन सुसाइड केली. ट्विंकल म्हणाली की, ही सामान्य क्रिया आहे. याविषयी लाज बाळगू नये. ती म्हणाली की पॅडमॅन पाहिल्यानंतर मुलींना वाटणारी लाज खुप कमी होईल.

 

'पॅडमॅन' ही फिल्म कोयंबतूरमध्ये राहणा-या अरुणाचलम मुरुगनंथमच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचलमने महिलांसाठी कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकिन बनवले होते. फिल्मचा एक ट्रेलर समोर आलाय. यामध्ये अक्षय सॅनिटरी नॅपकिनची मशीन बनवताना दिसतोय. कारण गावातील महिलांना कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकिन मिळावे. या कामामुळे चित्रपटात त्याची पत्नीही नाराज होते आणि गावातील लोकही त्याची खिल्ली उडवतात. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फिल्म पॅडमॅनचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...