आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dhavan family: एका फ्रेममध्ये धवन कुटूंब, दिड महिन्याच्या पुतणीसोबत वरुणने काढला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : वरुण धवनने बुधवारी कुटूंबासोबतचा एक फोटो शेअर केला. विशेष म्हणजे या फोटोमध्ये संपुर्ण धवन कुटूंब एकत्र दिसत आहे. फोटोमध्ये वरुण धवनचे वडील डेविड धवन, आई करुणा, भाऊ रोहित, वहिणी जान्हवी आणि दिड महिन्याची पुतणी दिसत आहे. वरुणने या फोटोला "love at first sight" असे कॅप्शन दिले आहे. रोहित-जान्हवी दिर्घकाळापासून बाळाच्या प्रतिक्षेत होते. 29 मे रोजी त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला. या दोघांचे हे पहिले बाळ आहे. 


एप्रिलमध्ये झाले होते जान्हवीचे बेबी शॉवर
- वरुण धवनची वहिणी जान्हवीचे बेबी शॉवर एप्रिलमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासुध्दा पोहोचली होती.
- सोनाक्षीने सोशल मीडियावर बेबी शॉवरचे फोटोज शेअर केले होते. यामध्ये जान्हवी आणि रोहितसोबत ती सेल्फी घेताना दिसत आहेत.
- तर वरुणनेही फंक्शनचे फोटो शेअर केले होते. यामध्ये त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल आणि धवन कुटूंबीय एकत्र दिसत होते.
- रोहित धवन आणि जान्हवीने 2012 मध्ये गोव्यात लग्न केले होते. रोहित डायरेक्टर आहे. त्याने 'देसी बॉय', 'ढिशूम' सारखे चित्रपट डायरेक्ट केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...