आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐकले का? वरुणच्या \'ऑक्टोबर\'ची झाली एवढीच कमाई, रेमोच्या फिल्मसाठी घेणार 32 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वरुण धवनने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याच्या सर्वच चित्रपटांना भरभरून यश मिळाले. एकही चित्रपट फ्लॉप झाला नाही. दमदार अभिनय आणि डान्सिंग टॅलेंटच्या बळावर वरुणने 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'जुड़वा 2' सारख्या चित्रपटांना यश मिळवून दिले, तर 'बदलापुर' आणि 'ऑक्टोबर'सारख्या ऑफबीट चित्रपटांनाही यश मिळाले. नुकताच रिलीज झालेल्या 'अक्टूबर'ने मोठी कमाई केली नाही, मात्र त्याच्या अभिनयामुळे समीक्षकांनीही त्याचे कौतुक केले. वरुण आता यशराज बॅनरसोबत 'सुई-धागा' चित्रपट करत आहे. शिवाय लवकरच तो रेमो डिसूझाच्या डान्सवर आधारित मोठ्या बजेटच्या एका चित्रपटात दिसणार आहे. 

 

ही आहे 'ऑक्टोबर'ची कमाई...  
वरुण धवनच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांनी 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र, 'ऑक्टोबर'ने बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली नाही. या चित्रपटाने रिलीजनंतर आतापर्यंत फक्त 27.99 कोटी रुपयेच कमावले. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई 5.04 कोटी रुपये होती. त्यानंतर शनिवारी 7.47 कोटी, रविवारी 7.74 कोटी, सोमवारी 2.70 कोटी आणि मंगळवारी 2.61, बुधवारी 2.43 कोटीचं कमावले. सूत्राच्या माहितीनुसार, चित्रपटाचे बजेट 45 कोटी रुपये होते, त्यामुळे मेकर्सची निराशा झाली आहे. 


पुढे वाचा, रेमोच्या चित्रपटात कतरिनासोबत झळकणार आहे वरुण धवन... 

बातम्या आणखी आहेत...