आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Versatile Actor Anupam Kher Bonding With Mahesh Bhatt After Debuting In SaaranshVersatile Actor Anupam Kher Bonding With Mahesh Bhatt After Debuting In Saaransh

महेश भट्ट यांना प्रत्येक चित्रपटाच्या कमाईचा वाटा देतात अनुपम खेर, 34 वर्षांपासून फेडत आहेत कर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अनुपम खेर आणि महेश भट्ट बॉलिवूड इंडस्ट्रीमधील खुप चांगले मित्र मानले जातात. 1984 मध्ये महेश भट्ट यांनी त्यांना 'सारांश' चित्रपटातून डेब्यू करण्याची संधी दिली होती. चित्रपटात अनुपम खेर यांनी साकारलेली भूमिका त्यांच्यासाठी सर्वात आयकॉनिक भूमिकांपैकी एक बनली. तेव्हापासून महेश भट्ट आणि अनुपम खुप चांगले मित्र बनले आणि दोघंही एक ट्रेडिशन फॉलो करतात. ज्यावेळी अनुपम एखादा नवा प्रोजेक्ट साइन करतात तेव्हा ते महेश भट्ट यांना गुरु दक्षिणा म्हणून पैसे भेट देतात.

 

महेश भट्ट यांना गुरु दक्षिणा देतात अनुपम
- गेल्या 3 दशकांपासून (34) अनुपम ज्यावेळी एखादा मोठा चित्रपट किंवा प्रोजेक्ट साइन करतात, तेव्हा ते सर्वात पहिले याविषयी महेश भट्ट यांना सांगतात. काही काळापुर्वी अनुपम यांनी एक ब्रिटिश शो साइन केला होता. यानंतर ते काही पैसे घेऊन महेश भट्ट यांना भेटायला गेले होते. अनुपम यांनी स्वतः आपला शो 'कुछ भी हो सकता है'(2014-15) मध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता. जेव्हा ते महेश भट्टला भेटतात, तेव्हा ते भेट म्हणून त्यांना काही पैसे देतात.
- महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांना करिअरच्या सुरुवातीस मदत केली होती. यामुळे अनुपम खेर असे करतात.
- अनपम सांगतात की, त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपले 34 वर्षे पुर्ण केले आहेत. 'सारांश' चित्रपटात 65 वर्षांच्या वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारने ही करिअरची त्यांची सर्वात मोठी चूक आहे असे लोक म्हणत होते. परंतू हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी माइलस्टोन ठरला.


सध्या या गोष्टीमुळे आहेत दुःखी
ट्वीटच्या क्लीन अप पॉलिसीमुळे अनुपम खेरच्या ट्वीटरवर 1.30 लाख फॉलोअर कमी झाले आहेत. या गोष्टीमुळे टेंशनमध्ये असलेल्या अनुपमने एक ट्वीट करत लिहिले की, 
"ट्विटरवर जवळपास 1.30 लाख फॉलोअर्स गमावण्याचे हे सुरुवातीचे साइड इफेक्ट आहेत. मला सांगण्यात आले होते की, ते क्लीनिंग अप पॉलिसीचा भाग आहेत. परंतू नंतर मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. एक जिज्ञासा, अविश्वास आणि मेमेरी लॉससारखी स्थिती आहे. परंतू मला असे वाटते की, त्यांनी मला त्यांच्या संपत्तीतून बेदखल केले आहेत."


या चित्रपटात व्यस्त आहे अनुपम
- सध्या अनुपम खेर 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये ते एक्स प्राइम मिनिस्टर मनमोहन सिंहची भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंहच्या मीडिया एडवायजर संजय बारुचे पुस्तक 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह' वर तयार होतोय.
- दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टेच्या या चित्रपटात अनुपम खेरसोबत अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

 

अनुपम यांचे ट्विट
Losing almost 130000 followers on @Twitter had its initial side effects. Panic, memory loss, disbelief, anxiety, questioning my eyesight etc. Even tho I was explained patiently that it is part of cleaning up policy. But I felt जैसे उन्होंने मुझे अपनी जायदाद से बेदख़ल कर दिया।😳😂— Anupam Kher (@AnupamPKher) July 14, 2018

 

बातम्या आणखी आहेत...