Home »News» Vetran Actress Nirupa Roy Sons Ugly Fight Over Property

दिवंगत अभिनेत्री निरुपा रॉय यांच्या मुलांमध्ये संपत्तीवरुन वाद, मोठ्या मुलाने दारु पिऊन केला धिंगाणा

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 10:06 AM IST

  • निरुपा रॉय यांचे घर आणि त्यांचा लहान मुलगा किरण

मुंबई - अभिनेत्री दीवारमध्ये अमिताभ आणि शशी कपूरच्या आईची भूमिका करणाऱ्या

निरुपा रॉयच्या मुलांमध्ये झालेल्या संपत्तीच्या वादावरुन जोरदार भांडण झाले. घराच्या मालकीहक्कावरुन हा वाद झाला आहे. मालाबार पोलीस् स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, निरुपा रॉयचा लहान मुलगा किरणने रात्री फोन करुन मोठा भाऊ योगेशने दारु पिऊन त्याला आणि त्याच्या पत्नीला मारहाण केली आहे. घराच्या खिडकीची काच फोडून शिवीगाळही केली.

- किरणने सांगितले की त्याचा मोठा भाऊ योगेश घरातील त्या हिस्स्यात पोहोचला जिथे किरण आणि त्याची फॅमिली राहते. त्याने यावेळी खिडकीची काच फोडली आणि शिवीगाळही केली.

- किरणचा आरोप आहे की, योगेश नशेत धुंद झाला होता आणि त्याने किरणच्या पत्नीलाही धक्का दिला. यावेळी किरणने सांगितले की, जर मी माझ्या पत्नी-मुलांना घेऊन एका खोलीत लपलो नसतो तर योगेशने त्यांच्यावर अजून हल्ला केला असता.

मोठ्या भावाने दिला सर्व आरोपांना नकार...
तर दुसरीकडे, मोठा भाऊ योगेशने सर्व आरोप खोटे सांगितले आहेत. त्याने सांगितले की किरणनेच त्याला मॅसेज पाठवून चिडवले. योगेशने सांगितले की, किरण मुद्दाम पूर्ण घराच्या लाईट्स लावून ठेवतो कारण लाईटबिल मी भरतो.

पुढच्या स्लाईडवर वाचा, 55 वर्षापूर्वी निरुपा यांनी 10 लाखात खरेदी केले होते घर...

Next Article

Recommended