आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही परिस्थितीत 'लव्हरात्री' चालू देणार नाही - VHP

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान लवकरच 'लव्हरात्री' या चित्रपटातून बहिण अर्पिताचा नवरा आयुष शर्माला लॉन्च करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री वरीना हुसैन काम करतेय. परंतू चित्रपट रिलीज होण्यापुर्वीच तो वादात अडकला आहे. विश्व हिंदू परिषदेचा आरोप आहे की, चित्रपटाचे टायटल लव्हरात्रीमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. 'लव्हरात्री' या चित्रपटाचे टायटल हिंदूचा सन नवरात्री या शब्दावरुन घेतले आहे.

 

विश्व हिंदू परिषदेच्या इंटरनॅशनल वर्किंग प्रेसिडेंट आलोक कुमारने सांगितले की, आम्ही हा चित्रपट थिएटर्समध्ये चालू देणार नाही. हिंदूची धार्मिक आस्था आणि भावनांना ठेस पोहोचावी असे आम्हाला वाटत नाही असे ते म्हणाले. या चित्रपटाचे प्रोड्यूसर सलमान खान आहे. डायरेक्टर अभिराज मीनावालाचा हा चित्रपट 21 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट गुजराती बॅकग्राउंडवर आधारीत आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात एका जोड्याची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. ज्यांचे प्रेम नवरात्री दरम्यान सुरु होते. चित्रपटात आयुष शर्मा आणि वरीना हुसैन प्रमुख भूमिका साकारत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा लव्हरात्रीमध्ये आयुष्य शर्मा आणि वरीना हुसैनचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...