आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकी कौशल आहे अमृताच्या डान्सचा फॅन, ‘राजी’च्या सेटवर धरला एकत्र ठेका!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या 'राजी' सिनेमात आपल्याला दिसणार आहे. ह्या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान बॉलिवूड अभिनेता विकी कौशल अमृता खानविलकरचा फॅन असल्याचा उलगडा अमृताला झाला.

 

अमृता खानविलकरला ह्याविषयी विचारलं असता ती म्हणते, “मी आणि विकी ‘राजी’च्या संहिता वाचनासाठी भेटलो होतो. त्यानंतर चित्रीकरणाला सुरूवात झाल्यावर आमची मैत्री झाली. पटियालाच्या शुटिंगच्यावेळी एकेदिवशी विकीला ‘वाजले की बारा’ हे माझंचं गाणं असल्याचा उलगडा झाला. त्याला हे गाणं माहित होतं, आवडतंही होतं. पण ह्या गाण्यावर मीच डान्स केलाय, हे माहित नसल्याने त्याला आश्चर्याचा धक्का बसला होता.”

 

अमृता पूढे सांगते, “मला आजही आठवतंय, तो धावतंच माझ्याकडे आला. आणि त्याने मला तो माझा फॅन असल्याचं सगळ्यांसमोर सांगितल्यावर मला हसूच फुटलं. विकी कौशल?.... आणि माझा फॅन?... खरं तर 'मसान' चित्रपट पाहून मी त्याची फॅन झाले होते...  पण विकी सुध्दा तेवढ्यावरच थांबला नाही. त्यादिवशी आमचं शुटिंग संपल्यावर रात्री ‘वाजले की बारा’ गाण्यावर आम्ही दोघंही खूप नाचलो.”

 

अमृता म्हणते, “दरवर्षी अंतरराष्ट्रीय नृत्य दिवशी माझ्या आवडत्या डान्सरबद्दल मला विचारलं जातं. पण यंदाच्या ‘डान्स डे’ला मी फिल्म इंडस्ट्रीमधल्या कोणाची तरी आवडती नर्तिका आहे, ह्याचा मला आनंद वाटतो आहे. आणि अशी शाबासकी मग मला अजून चांगलं काम करायला प्रोत्साहित करते.”  


पुढील स्लाईडवर बघा, अमृता आणि विकीच्या डान्सचा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...