आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'Sanju': संजय दत्तचा खरा बेस्ट फ्रेंड परेश घेलानीला भेटला विक्की कौशल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: 'संजू' चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारल्यामुळे रणबीर कपूरची प्रशंसा होत आहे. तर त्याचा फ्रेंड बनवलेल्या कमलेश कन्हैयालाल कापसी म्हणजेच 'कमली'च्या भूमिकेत विक्की कौशलचा अभिनयही उत्तम झाला आहे. एका मुलाखतीत विक्कीने सांगितले होते की, 'ही भूमिका संजयच्या तीन-चार मित्रांचे मिश्रित स्वरुप आहे. परंतू मुळतः हे संजयचा जवळचा मित्र परेश घेलानीवर आधारित आहे. हा मित्र यूएसमध्ये राहतो.' नुकतीच रील आणि रियर परेशची भेट झाली. याचा फोटो विक्कीने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने फोटोला "Real and Reel. Paria and Kamli.'' असे कॅप्शन दिले आहे. 

 

कोण आहे परेश घेलानी? 
परेशला संजय प्रेमाने 'पर्या' म्हणतात. 'रॉकी' चित्रपटाच्या काळात दोघांची मैत्री झाली. तेव्हापासून आतापर्यंत दोघांच्या आयुष्यात एकमेकांना महत्त्वाचे स्थान आहे. संजयच्या वाईट काळात तो नेहमी संजयसोबत उभा होता. सध्या परेश लॉस एंजेलसमध्ये राहतो.


बिझनेसमन आहेत परेश
परेश एक बिझनेसमन आहेत. त्यांना भारतात XPRIZE आणण्याचे श्रेय दिले जाते. XPRIZE एक नॉन प्रॉफिट ऑर्गेनाईजेशन आहे जी सार्वजनिक स्पर्धांचे आयोजन करते. या स्पर्धांमधून टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील टॅलेंट पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय ते Moon Express, Viome Inc, DTV Motor Corporation, Ferrate Treatment Technologies, Casepoint, Radimmune Therapeutics या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार आहेत.

 

परेश यांनी 2020 एलएलसी कंपनीचा पाय रोवला आहे. यामध्ये सुमारे 1000 लोक काम करतात. ही कंपनी अमेरिकन सरकारला शिक्षा, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रदान करण्याचे काम करते. परेश यांना लाइमलाइटमध्ये राहणे पसंत नाही. पण संजयच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर ते त्याच्या सोबत असतात.

 

 

बातम्या आणखी आहेत...